निर्जंतुकीकरणासाठी आधुनिक साधनांचा वापर केल्यास विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहील – सोपान कांचन

अमोल भोसले,उरुळी कांचन

कोरोना काळात महामारीशी लढताना नवनवीन निर्जंतुकीकरण साधनांचा वापर करणे अनिवार्य झाले आहे. ज्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहे अशा शाळांमधून नवीन हायजेनिक निर्जंतुकीकरण उपकरणांचा वापर केला तर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल. असे मत महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सचिव सोपान कांचन यांनी मांडले.

उरुळी कांचन (ता. हवेली ) येथील डॉ. सायरस पूनावाला इंग्रजी माध्यम शाळेतील नॅनो बबल ओझोन फ्लोअर क्लिनिंग कॅडी सिस्टीम या निर्जंतुकीकरण करण्याऱ्या यंत्रणेचे उद्घाटन शाळेमध्ये करण्यात आले.

यावेळी विश्वस्त मनोहर कांचन, जिल्हा परिषद सदस्या किर्ती कांचन, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, पु.जि.नि.स. सदस्य संतोष कांचन, सरपंच संतोष कांचन, उपसरपंच संचिता कांचन, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद जगताप,अमित कांचन, राजेंद्र ब.कांचन, शंकर बडेकर, स्वप्नीशा कांचन, प्राचार्य बबनराव दिवेकर, राजकुमारी लक्ष्मी, जितेन शहा, शशी संगम, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे शैक्षणिक संकुलचे प्रमुख शिक्षक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.

विभासेफ कंपनीचे कार्यकारी संचालक हरिष अनंतरामण यांनी साधे पाणी वापरुन कोणत्याही रासायनिक द्रव्यांचा वापर न करता सार्वजनिक ठिकाणे वा वापराच्या वस्तू या मशिनद्वारे निर्जंतुक केल्या जातात हे प्रात्यक्षिकासह उपस्थितांना समजावून सांगितले.

Previous articleगोरगरिबांना साडीचोळी देऊन श्री शिवछत्रपती मंडळाचा साधेपणाने नवरात्रोत्सव
Next articleजुन्नर मधील चार शिक्षकांचा जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव