जुन्नर मधील चार शिक्षकांचा जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

नारायणगाव ,किरण वाजगे

जुन्नर शहरातील चार शिक्षकांना जिल्हा पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले आहे. यामध्ये अतुल औटी प्राचार्य सबनीस प्राथमिक विद्यालय ,शत्रुघ्न लबडे मुख्याध्यापक काँर्नेल मेमोरियल स्कूल ,रेश्मा शेख मुख्याध्यापिका अजुंमन प्रायमरी स्कूल व राजेंद्र ढोबळे मुख्याध्यापक प्राथमिक विद्यालय बारव या शिक्षकांसह सन २०२०-२१ व २०२१-२२ या दोन वर्षातील सुमारे ५८ शिक्षकांना महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती शाखा पुणे जिल्हा यांच्या वतीने शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

संघटनेचे महासचिव अंजन पाटील ( धुळे )परीक्षा परिषदेेचे उपायुक्त हारूण अत्तार पुणे जि.प. चे प्रशासकीय अधिकारी केंद्रे यांचा पुणे जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला.

आयुक्त विशाल सोळंकी व सहसंचालक महेश पालकर , उपसंचालक उकिर्डे ,शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांना शुभेच्छा पत्राद्वारे व दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देऊन गौरव केला.

कार्यक्रमाचे नियोजन राज्य उपाध्यक्ष सारंग पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष तथा राज्य कार्याध्यक्ष संतोष शिळमकर, राज्य शिक्षकेतर प्रमुख गुरुबा मोराळे, राज्य सहसचिव धीरज गायकवाड, महिला अध्यक्षा सौ. मोरे मॅडम, गुजराती विद्यालय व शैक्षणिक संकुलाच्या मुख्याध्यापिका पटेल मॅडम उपाध्यक्ष शिवाजीराव माने ,सचिव श्रीकांत रहाने सर, राठोड सर तसेच इतर कार्यकर्त्यांनी केले.

Previous articleनिर्जंतुकीकरणासाठी आधुनिक साधनांचा वापर केल्यास विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहील – सोपान कांचन
Next articleदुचाकीचा धक्का लागल्याने चारचाकीतील तिघांची तरूणाला बेदम मारहाण; मारहाणीत तरूणाचा मृत्यू