वाघोलीतील पुरातन वाघेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले

गणेश सातव,वाघोली

कोरोना महामारीच्या नियमात राज्य शासनाने केलेल्या बदलानुसार अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर वाघोली येथील पुरातन वाघेश्वर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी शासनाच्या आखून दिलेल्या नव्या नियमावली व आदेशानुसार खुले करण्यात आले आहे.


पुरातन अश्या वाघेश्वर शिवमंदिरात वर्षानुवर्षे रितीरिवाजाप्रमाणे अनेक धार्मिक कार्यक्रम संपन्न होत होते.परंतु गेले दिड- दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते.
नुकतीचं राज्य शासनाने शाळा,मंदिर व काही सार्वजनिक गोष्टींना योग्य शासकीय नियमावली आखून खुले करण्याबाबत आदेश दिला त्यानंतर लगेचचं वाघेश्वर मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले.

यावेळी भाविकांबरोबरचं मंदिर परिसरातील छोट्या व्यावसायिकांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत करुन आनंदोत्सव साजरा केला .

Previous articleअखिल भारतीय ग्राहक पंचायतच्यावतीने कोरेगाव भिमा येथे ‘टपाल दिन’ साजरा
Next articleवाखारी ग्रामपंचायतीच्या कोरोना नियंत्रण कक्षाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांच्या हस्ते उद्घाटन