अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्यावतीने कोरेगाव भिमा येथे ‘टपाल दिन’ साजरा

गणेश सातव,वाघोली

आज जागतिक टपाल दिन.टपाल दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा व हवेली तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने कोरेगाव भिमा येथील उप डाकघर केंद्रात टपाल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


यावेळी ग्राहक पंचायत पुणे जिल्हा व हवेली तालुका यांच्यावतीने कोरेगाव भिमा उप डाकघर येथील सब पोस्ट मास्तर सचिन ठाकूर, पिंपरी सांडस पोस्टमास्तर श्रीमती चंद्रकला शेळके,पोस्टमन सचिन कंचे,पँकर अशोक परदेशी यांचा श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

पुणे जिल्हा संघटक भानुदास सरडे,हवेली तालुका उपाध्यक्ष विठ्ठल आण्णा ठोंबरे, संघटक गणेश सातव,बिबरी गावचे माजी सरपंच व उद्योजक विलासशेठ गोते,कोरेगाव भिमा परिसरातील जेष्ठ कार्यकर्ते सोपानराव गव्हाणे,कोरेगाव भिमा वि.वि.कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन पंडितराव फडतरे,धानोरे-शेरी गावचे माजी सरपंच रघुनाथ झगडे,भाऊसाहेब गव्हाणे आदी मान्यवर सन्मान कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.

Previous articleप्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार ! प्रकल्पग्रस्तांच्या आढावा बैठकीत महेश पासलकर यांचे आश्वासन !
Next articleवाघोलीतील पुरातन वाघेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले