डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथतुळा

अमोल भोसले,उरुळी कांचन —प्रतिनिधी

उरुळी कांचन (ता.हवेली) येथील डाॅ.मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक – अध्यक्ष तसेच डाळिंब विठ्ठल देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र ज्ञानोबा कांचन यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने पुणेरी पगडी घालुन सत्कार करण्यात आला तसेच संस्थेचे कर्मचारी सुनिल तांबे व राहुल तांबे यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत ग्रंथतुळा करण्यात आली.

या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी, संचालक शरद वनारसे, सुभाष धुकटे, कांतीलाल चौधरी, भाऊसाहेब कांचन, खेमचंद पुरूषवाणी, संजय कांचन, चंद्रकांत लोणारी, बाळासो कांचन, दादा गोते, प्रकाश जगताप तसेच मुख्यव्यवस्थापक लक्ष्मण वाल्हेकर , संगिता काळे, अजय पवार, ऋषिकेश भोसले,लक्ष्मण हेंद्रे व सर्व शाखाधिकारी ,कर्मचारी वर्ग, तसेच संगिता कांचन, मयुरेश्वर कांचन , अनिकेत कांचन, अक्षय वनारसे व इतर मान्यवर उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम सोशल डिस्टनशिंग पाळत घेण्यात आला. दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम घेऊन कार्यक्रम घेतला जात असतो पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकदम साध्या पध्दतीने घेण्यात आला.

Previous articleमुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चर पुण्यात उपलब्ध करून द्यावे खा.डॉ अमोल कोल्हे यांची मागणी
Next articleकोरोणा विरुद्धची लढाई ही शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे   -खासदार डॉ.अमोल कोल्हे