नवीन पिढीला शाळांनी वन्यजीवांच्या रक्षणासाठी सुसंस्कारित करावे-योगेश नाईकरे

राजगुरूनगर-वन्यजीव सप्ताहानिमित्ताने कमानमधील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव जाणीव जागृती विषयक विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कमान गावचे सरपंच योगेश नाईकरे यांनी वन्यजीवांच्या रक्षणासाठी नवीन पिढीला सर्वच शाळांनी सुसंस्कारित करावे असे आवाहन केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमान व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारापाटी या दोन्ही शाळांच्या संयुक्त विद्यमाने आणि वनविभाग राजगुरुनगर यांच्या विशेष सहकार्याने आज वन्यजीव रक्षण व नवीन पिढीची जबाबदारी या विषयावर आधारित विद्यार्थी जाणीव जागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाला सर्व विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

राजगुरुनगर वनविभागाचे नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप रौंधळ यांच्या मार्गदर्शनाखाली
कमान येथे शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.वन्यजीव व वनसंपत्तीच्या रक्षण व संवर्धनासाठी येथे उपस्थित सर्वांनी वनप्रतिज्ञा घेतली.यावेळी श्री कुलकर्णी,श्रीमती नाईकवाडी, श्रीमती साबळे व श्रीमती वडजे एस एन यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

बारापाटी कमान शाळेचे पर्यावरणप्रेमी मुख्याध्यापक संजय नाईकरे यांनी पर्यावरण संवर्धन विषयक उपक्रमांची माहिती दिली.सध्या बहुचर्चित असलेल्या बिबट्याच्या समस्या,बिबट्याच्या सवयी,त्याचा नेमका धोका व घ्यावयाची काळजी यासंबंधाने देखील त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.निसर्ग प्रबोधन गीत सादर करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची गोडी निर्माण केली.याप्रसंगी वनपाल एस एस वाघुले माजी सरपंच अशोक नाईकरे कमान शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता बेनके, सहशिक्षिक राहुल हिरवे, पूनम मुळूक, प्रियांका कडलक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleशाळांनी नवीन पिढीला वन्यजीवांच्या रक्षणासाठी सुसंस्कारित करावे- योगेश नाईकरे
Next articleराजगुरूनगर मध्ये अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या एकाला अटक : २ लाख ८१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त