घराच्या बांधकामावरून भावकीतील लोकांनी नवरा-बायकोला केली बेदम मारहाण

Ad 1

प्रमोद दांगट- प्रतिनिधी

घोडेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चास कडेवाडी ( ता. आंबेगाव ) येथे नवीन घराचे बांधकाम सुरू केल्याने झालेल्या वादातून भावकितील लोकांनीच नवरा बायकोला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून याबाबत जयसिंग चासकर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवार दि.२८ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादीच्या नवीन घराचे बांधकाम चालू होते त्यावेळेस त्यांच्या भावकितील प्रशांत विलास चासकर, विलास बाबुराव चासकर ,शैला विलास चासकर, ( सर्व रा.चास,(कडेवाडी) ता.आंबेगाव,जि.पुणे ) हे घराच्या बांधकाम शेजारी आले व घराचे बांधकाम करण्यासाठी लावलेला पहाड ते सोडू लागले यावेळी फिर्यादी यांनी पहाट सोडू नका असे म्हणाले असता प्रशांत चासकर यांनी दगड हातात घेऊन फिर्यादीच्या पाठीवर मारला व विलास चासकर यांनी गुडघ्यावर व दंडावर काठीने मारले फिर्यादीची पत्नी आशा चासकर भांडण सोडवण्यासाठी आली असता तिला शैला चासकर हीने शिवीगाळ करत हाताने मारहाण केली यासंदर्भात जयसिंग मुरलीधर चासकर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात वरील तिघांविरोधात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास घोडेगाव पोलिस करत आहे.