काळेवाडी इंग्लिश मिडीयमचे घवघवीत यश इ.१० वी चा १००% निकाल

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

स्व. एस के कटारिया इंग्लिश मिडियम स्कूल काळेवाडी या शाळेचा इयत्ता १० वी चा निकाल १००% लागला असून कु. हर्षद संजय भोसले या विद्यार्थ्याने
९१ % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे तर द्वितीय क्रमांक कुमारी पुनम चांगदेव भोसले (८९.८०%) व तृतीय क्रमांक कुमारी प्रांजली प्रदिप कदम (८९.६०%) या विद्यार्थीनीने पटकावला आहे.

शाळेने १००% निकालाची परंपरा कायम ठेवली असून सर्वच विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. गणित विषयात माऊली लहू भोसले या विद्यार्थ्याने ९७ तर हर्षद संजय भोसले या विद्यार्थ्याने विज्ञान विषयात ९७ गुण मिळविले आहेत. सदर विद्यार्थ्यांना शाळेतील सर्वच अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले असून प्राचार्य सौ. पूजा मॅडम व संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रेमसुखजी कटारिया यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

ग्रामीण भागातील शाळा असूनही कोणतेही खाजगी क्लासेस नसतानाही सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्याने पालक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Previous articleघराच्या बांधकामावरून भावकीतील लोकांनी नवरा-बायकोला केली बेदम मारहाण
Next articleजुन्नर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४१५ वर पोहचली;नारायणगाव मध्ये आज पाच रुग्ण निष्पन्न