राहू – कोरोना नियंत्रण कक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते उद्घाटन

अमोल भोसले,उरुळी कांचन

जिल्हा परिषद पुणे आणि भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना मुक्त गाव अभियान अंतर्गत कोरोना नियंत्रण कक्ष राहू चे उदघाटन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते झाले. तसेच ग्रामपंचायतच्या अभिलेख कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये दौंड तालुक्याचे गट विकास अधिकारी अजिंक्य येळे , सहाय्यक गटविकास अधिकारी अजित देसाई, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन बोगावत भिगवण, भारतीय जैन संघटनेचे दौंड शहर अध्यक्ष सुशील शहा, पुणे जिल्हा उपाध्यक्ष हर्षल भटेवरा, पुणे विभागीय सचिव कमलेश गांधी, पुणे जिल्हा सचिव मनोज पोखरणा, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष वीरेश छाजेड, भिगवणचे अध्यक्ष गिरीश मुनोत, किरण रायसोनी तसेच दौंड तालुक्याचे भारतीय जैन संघटनेचे समन्वयक मयूर सोळसकर आणि अशोक वणवे उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे, पुणे जिल्हा भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष सचिन बोगावत, मराठा महासंघाचे जिल्हा सचिव मयूर सोळसकर आणि आमदार राहुल दादा कुल यांनी मनोगत व्यक्त केले.

राहू गावामध्ये पाच प्रकारच्या कोरोना नियंत्रण समित्या बनवल्या गेल्या आहेत. त्यातील सदस्यांना या कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने नियुक्तीपत्र देण्यात आले. भारतीय जैन संघटना आपत्तीमध्ये चांगले काम करत असून त्यामध्ये भूकंप, दुष्काळ, महापूर, तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे पुनर्वसन, कोरोना मध्ये मयत पावलेल्या पालकांच्या मुलांचे पुनर्वसन, आशिया खंडातील सर्वात मोठ्या धारावी सारख्या झोपडपट्टीमध्ये कोरोना नियंत्रण आदी उपक्रमांमध्ये हे जैन संघटनेचे उत्तम कार्य असल्याची माहिती मयूर सोळस्‍कर यांनी दिली. आणि त्याच धर्तीवर कोरोना मुक्त गाव अभियान दौंड तालुक्यातील आतापर्यंत ४५ गावांमध्ये भेटी देऊन २५ गावांमध्ये समित्या तयार करण्यात आले असल्याची माहिती तालुका समन्वयक मयूर सोळसकर यांनी दिली.

उपस्थित लोकांना मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट आमदार राहुल कुल यांनी चालू असलेल्या भारतीय जैन संघटनेच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या तसेच हा उपक्रम गावोगावी राबवा काही मदत लागल्यास अडचण आल्यास मला कळवा असे त्यांनी सांगितले. तसेच विविध शासकीय योजना, आरोग्य बाबतच्या योजना याविषयी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये दौंड तालुक्यातील कोविड हेल्प सेंटर या व्हाहाट्सअप ग्रुप मार्फत चांगले काम झाल्यामुळे ग्रुपचे ॲडमिन मयूर सोळसकर आणि सहकारी हर्षल भटेवरा यांचा सत्कार आमदार राहुल कुल यांनी केला.

यावेळी उपस्थितांमध्ये जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बंडु नवले, पंचायत समिती सदस्य किसन शिंदे, पोलीस पाटील सुरेश सोनवणे, सरपंच दिलीपजी देशमुख , उपसरपंच गणेश शिंदे, ग्रामसेवक गोरख थोरात, पत्रकार संतोष काळे, पत्रकार संदीप सोनवणे, पत्रकार संदीप नवले, पत्रकार रवींद्र खोरकर, उंडवडी माजी सरपंच सचिन गुंड, तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश गडदे, पिलानवाडी सरपंच डुबे, तसेच मराठा महासंघाचे दौंड तालुका उपाध्यक्ष संजय थोरात आदी मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुर सोळसकर यांनी तर आभार सरपंच दिलीप देशमुख यांनी मानले.

Previous articleउरुळी कांचन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची ३३ वी वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न
Next articleदोंदे गावातील शेतकऱ्यांना मोफत डिजिटल सातबारा उताऱ्यांचे वाटप