दोंदे गावातील शेतकऱ्यांना मोफत डिजिटल सातबारा उताऱ्यांचे वाटप

राजगुरूनगर- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार खेड तालुक्यातील दोंदे गावातील शेतकऱ्यांना मोफत डिजिटल सातबारा उताऱ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हा निर्णय घेतला आहे. 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता  महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून डिजिटल सातबारा उतारे देण्याची मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांना घरपोच डिजिटल सातबारा देण्याचे नियोजन केले.

यावेळी पंचायत समितीच्या सदस्य नंदाताई सुकाळे,कृषी पर्वेक्षक विजय पडवळ, सरपंच चंद्रकांत बारणे उपसरपंच सिद्धार्थ कोहिणकर, सदस्य हनुमंत कदम, तलाठी कांचन मगर,ग्रामसेवक निलेश पांडे,खंडेराव करंडे,महादु बनकर,शिवाजी सुकाळे, तान्हाजी बारणे,मच्छिंद्र सुकाळे, ज्ञानेश्वर कदम,निशांत बारणे, आनंदराव मेहेत्रे, आनंदराव कदम,पंडित उढाने, किसन बनकर,जितेंद्र कोहिणकर,सुधीर बारणे, रामभाऊ दरवडे, अतुल भलसिंगे, निलेश बारणे, सोपानराव उढाने, रघुनाथ सुकाले,संतोष बोऱ्हाडे यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.

Previous articleराहू – कोरोना नियंत्रण कक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते उद्घाटन
Next articleप्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण वर्ग संपन्न