आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून उभारला जातोय जगातील सर्वांत उंच स्वराज ध्वज

अमोल भोसले,उरुळी कांचन

कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांची संकल्पना आणि आयोजनातून सिद्ध झालेली स्वराज्य ध्वज यात्रा पूर्व हवेली मध्ये थेऊर याठिकाणी आगमन झाल्याने चिंचवड देवस्थान व थेऊर ग्रामपंचायतच्या वतीने स्वराज्य ध्वजाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. फुलांची उधळण, रांगोळीच्या पायघड्या, घालण्यात आल्या होत्या. ७४ मीटर उंचीचा, ९६ बाय ६४ फूट आकाराचा व ९० किलो वजन असलेला भारतातील सर्वात उंच ‘भगवा ध्वज’ अर्थात स्वराज ध्वज कर्जत जामखेड मतदारसंघातील खर्डाजवळील शिवपट्टण किल्ल्यावर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर उभारण्यात येत आहे.

थेऊर ग्रामपंचायत, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे तसेच आसपासच्या गावातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. ध्वजासोबत आलेल्या शिवभक्तांचा सत्कार थेऊर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. कोविड काळातही कोविड संबंधीचे सर्व आवश्यक नियम पाळून अत्यंत नियोजनबद्ध रितीने स्वराज्य ध्वज मोहिम राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून महत्त्वाकांक्षी प्रवास करत आहे.


याप्रसंगी राज्य साखर कामगार संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, चिंचवड देवस्थानचे विश्वस्त आनंद महाराज तांबे, कोरेगावमूळचे सरपंच विठ्ठल शितोळे, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे अध्यक्ष योगेश शितोळे, शिंदवणेचे माजी सरपंच आण्णा महाडिक, माजी उपसरपंच विलास कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, दत्तात्रय कुंजीर, गोविंद तारू, विठ्ठल काळे, बाजीराव भालसिंग, दिलीप उंद्रे, संदीप कुंजीर, सुदाम कुंजीर, कविता शेडगे, राहुल कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रासह देशातील विविध ७४ धार्मिक, आध्यात्मिक स्थळी, स्मारक व गडकिल्ल्यांवर या स्वराज ध्वजाचे पूजन होत आहे.

Previous articleशेतकऱ्यांना पाच लाखांचे कर्ज शून्य टक्के दराने : देशात पुणे जिल्हा बँकेची आघाडी
Next articleदावडी येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न