दावडी येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न


राजगुरुनगर- राज्य शासनाने जाहीर केले प्रमाणे शाळा लवकरच सुरु होणार आहे . या पार्श्वभूमीवर शेलपिंपळगाव केंद्राची शिक्षण परिषद नुकतीच दावडी येथे संपन्न झाली . या परिषदेचे उद्घाटन दावडी गावचे सरपंच संभाजी घारे यांच्या हस्ते झाले .


या कार्यक्रमाला उपसरपंच राहूल कदम , अनिल नेटके केंद्रप्रमूख, संतोष मांजरे विस्तार अधिकारी, साधना वाघोले पर्यवेक्षक ,आगम सर बाळासो दुंडे, रमेश होरे यांसह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते .


यावेळी पंचसुत्री कार्यकृम , शाळा सक्षमीकरण ,गुणवत्ता वाढ इत्यादी विषयावर अर्चना पवार ,भांगे मॅडम यांनी प्रशिक्षण दिले . अशोक सातपुते यांचा स्था लेखापरिक्षक पदी निवड झाल्याबद्दल सरपंचांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

विस्तार अधिकारी सौ.साधना वाघोले यांनी दावडी गावचे सरपंच, उपसरपंच यांनी शाळांच्या केलेल्या कामाबद्दल कौतुक केले.त्यानंतर ४ ऑक्टोबर २०२१ पासून शाळा व्यवस्थापन समितीच्या संमतीने पाच ते आठ शाळा सुरु करण्यास संदर्भातील निकष कथन केले. शालेय स्वच्छता , सॅनीटायजेशन, मास्क सुरक्षित सामाजिक अंतर कोरोना फैलाव होणार नाही याची खबरदारी घेऊन, शाळा सुरू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

दावडी हायस्कूलच्या अष्टपैलू शिक्षिका भांगे मॅडम यांनी ,कृती आराखडा,भौतिक सुविधांविषयी माहिती दिली.शिकू आनंदे कार्यक्रम,स्वाध्याय उपक्रम, किशोर गोष्टी उपक्रम काय आहे? त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे करायची? याविषयी विस्तृत विवेचन केले.केंद्रप्रमुख संतोष मांजरे यांनी ” निपुण भारत अभियान” या कार्यक्रमाची उद्दिष्टे व अंमलबजावणी या विषयी मार्गदर्शन केले.

जिल्हा परिषद शाळा शेलपिंपळगाव शाळेच्या हरहुन्नरी आणि अष्टपैलू तंत्रस्नेही शिक्षिका अर्चना पवार मॅडम यांनी शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी पंचसूत्री कार्यक्रमाविषयी अत्यंत अभ्यासपूर्वक व सोप्या भाषेत मांडणी करून प्रत्येक मुद्दा व्यवस्थित समजावून दिला.
तसेच पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN)याविषयी विस्तृत माहिती पीपीटी च्या सहाय्याने आपल्या खास शैलीत सर्वांना समजेल अशा पद्धतीने करून दिला .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कविता धुमाळ व आभार दिवाण विधाटे यांनी केले .

Previous articleआमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून उभारला जातोय जगातील सर्वांत उंच स्वराज ध्वज
Next articleमाहिती सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी माहिती अधिकार कायद्याच्या बरोबरच गावोगावी वृक्षसंवर्धन चळवळ राबवावी – चंद्रकांत वारघडे