कोरेगाव मूळच्या महिला पोलीस पाटील वर्षा कड यांना मिळाला बंदुकीचा परवाना

अमोल भोसले

हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळच्या महिला पोलीस पाटील वर्षा सचिन कड यांना गावातील काम करताना स्वसंरक्षणासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिनियमानुसार रायफल परवाना मिळाला असून  जिल्हाधिकारी कार्यालया मध्ये शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते बंदूक देण्यात आली.

आमदार अशोक प

वार यांनी माहिती देताना सांगितले की, पोलीस पोलीस पाटलाचे कर्तव्य बजावताना स्वसंरक्षणासाठी नियमावलीनुसार वापर करावा. पोलीस पाटील हा शासनाचा प्रतिनिधी म्हणून गावातील रहिवासी प्रतिनिधी असल्याने स्वतःची व गावातील संरक्षणाची जबाबदारी पोलीस पाटलावर असते.तसेच कर्तव्य बजावताना पोलीस पाटलांनी कसल्याही प्रकारे भेदभाव करू नयेत गावातील तंटे गावातच मिटवण्याचा प्रयत्न करावा. पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाला सहकार्य करावे. हवेलीतील सर्वच पोलीस पाटलांचे कोविड काळातील कार्य कौतुकास्पद असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.

तसेच पोलीस पाटील वर्षा सचिन कड यांनी परवाना घेण्यासाठी विशेष प्रयत्न करून यासाठी गावातील सरपंच विठ्ठल शितोळे, माजी उपसरपंच मनीषा कड , नंदकुमार कड ,सचिन कड,शंभुराजे कड आणि निशांत कड उपस्थित होते.

पोलीस पाटील संघाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे ,पोलीस पाटील विजय टिळेकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.अशी माहिती कोरेगावमुळच्या पोलीस पाटील वर्षा कड यांनी दिली.

Previous articleमैदानी स्पर्धेमध्ये मदने दांपत्याची गगन भरारी
Next articleधर्मवीर संभाजी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना १० टक्के लाभांश व दीपावली निमित्त किराणा साहित्य