धर्मवीर संभाजी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना १० टक्के लाभांश व दीपावली निमित्त किराणा साहित्य

नारायणगाव, (किरण वाजगे)

नारायणगाव येथील अग्रगण्य
समजल्या जाणाऱ्या धर्मवीर संभाजी पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने संस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. सभेमध्ये सर्व विषयांवर सविस्तर चर्चा होऊन ठराव संमत करण्यात आले. यावेळी संस्थेने सभासदांना दहा टक्के लाभांश व दीपावलीनिमित्त किराणा साहित्य वाटपाचे ठरावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर औटी यांनी दिली.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे, माजी जिल्हा परिषद सदस्य व संचालक मारुती काळे, प्रा. मेहबूब काझी, सिताराम खेबडे, विठ्ठलराव श्रीवत, प्रवीण डेरे, राजेश कोल्हे, कैलासऔटी, रामा शिंदे,संध्या गायकवाड, सुजाता तांबे व सल्लागार मंडळ उपस्थित होते.

आर्थिक वर्षात संस्थेने ३० कोटी ठेवींचा टप्पा पार केला असून संस्थेचने सभासदांना २३ कोटी ३३ लाखांचे कर्ज वितरण केले आहे.संस्थेने ५० कोटीचा एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार केला असून अहवाल सालात ४० लाख ६० हजार ₹ इतका नफा मिळविला आहे. संस्थेस सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ ‘ मिळत आहे. सभासदांना दहा टक्के लाभांश व दीपावली भेट वस्तू वाटप व इतर ठरावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. सभेच्या निमित्ताने संस्था सभासद कृषिभूषण अनिल तात्या मेहेर,जयहिंद पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाबराव नेहरकर,अजिंक्यतारा पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबुराव मुळे,शिवाजीराव गायकवाड, विजय तोडकर, राजकुमार कोल्हे,शैलेश औटी,नवनाथ हांडे,अनिल डेरे,किशोर कोल्हे,रुपेश डेरे आदी सभासदांनी ऑनलाईन पद्धतीने सभेत सहभाग घेतला.


सभेमध्ये कर्जदार सभासद विमा,संस्था कार्यालय खरेदी किंवा बांधकाम, सभासदत्व रद्द झालेल्या सभासदांना सभासद करून न घेणे इत्यादी विषयांवर चर्चा झाली. सभेसाठी संस्था सभासदांची ऑनलाइन उपस्थिती लक्षणीय होती.सभेचे सूत्रसंचालन संचालक प्रा. मेहबूब काझी यांनी केले व आभार संचालक राजेश कोल्हे यांनी मानले.

Previous articleकोरेगाव मूळच्या महिला पोलीस पाटील वर्षा कड यांना मिळाला बंदुकीचा परवाना
Next articleकुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत