कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत

किरण वाजगे,नारायणगाव

 येथील नारायणवाडी शिवारातील बोरपटी परिसरातील सुरेखा वसंतराव खैरे यांच्या शेतामधील विहिरीत आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी पहाटे एक बिबट्या पडल्याची घटना उघडकीस आली.

येथील शेतकरी बालाजी घोलप हे विहिरी जवळून जात असताना त्यांना बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज आला. ही माहिती कळताच त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांच्यासह माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर यांच्यासह बिबट रेस्क्यू टीम चे सदस्य तसेच वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान कुत्र्याचाः पाठलाग करत असताना हा बिबट्या विहिरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
तत्पूर्वी बिबट्या विहिरीत पडल्याची खबर परिसरात वार्‍यासारखी पसरली त्यानंतर स्थानिक शेतकरी ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली. सकाळी साडे आठच्या दरम्यान या बिबट्याला वन विभागाचे अधिकारी कर्मचारी व बिबट रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी विहिरीत शिताफीने पिंजरा सोडून काही मिनिटात बिबट्याला रेस्क्यू करत माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात पुढील उपचारासाठी दाखल केले.

या यशस्वी रेस्क्यू कारवाईसाठी जुन्नर चे वनक्षेत्रपाल अजित शिंदे एसओएस संस्थेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ निखिल बनगर, महेंद्र ढोरे, वनपाल एम. जे. काळे, नितीन विधाटे, वनरक्षक रमेश खरमाळे, नारायण राठोड, स्वरूप रेंगडे, निलेश विरणक, संजय गायकवाड, रामेश्वर फुलवाड वनकर्मचारी खंडू भुजबळ, पंढरी भालेकर, बाबू नेहरकर, रेस्क्यू टीम मेंबर किरण वाजगे, रमेश सोलाट, आकाश डोळस, वैभव गावडे, जितेंद्र भोर तसेच स्थानिक नागरिक आशिष वाजगे, मिलिंद वाजगे, संतोष ब. वाजगे, विश्वास पाटे, वसंत वाघ, गुलाब वाघ, राहुल वाजगे, संजय आरोटे, सुहास वारूळे तसेच भिल्ल वस्ती, वाजगे वस्ती येथील ग्रामस्थांनी बिबट्याला विहिरीतून काढण्यात परिश्रम घेतले.

Previous articleधर्मवीर संभाजी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना १० टक्के लाभांश व दीपावली निमित्त किराणा साहित्य
Next articleशेतकऱ्यांना पाच लाखांचे कर्ज शून्य टक्के दराने : देशात पुणे जिल्हा बँकेची आघाडी