नंदकिशोर घोडके यांची निवड

दिनेश पवार, दौंड

नंदकिशोर भानुदास घोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग दौंड तालुका ग्रामीण उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, सदर निवडीचे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले,जिल्हाध्यक्ष जितेंद्र बडेकर, दौंड तालुका अध्यक्ष विशाल शेलार,दौंड शहर अध्यक्ष दीपक सोनवणे यांच्या शिफारशीने सदर निवड करण्यात आली आहे.

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार यावेळी उपस्थित होते,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांसाठी भरीव कामगिरी करणार असल्याचे नंदकिशोर घोडके यांनी सांगितले.

Previous articleअष्टापूर ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी विजय कोतवाल तर उपाध्यक्षपदी प्रशांत कोतवाल यांची निवड
Next articleचोरीला गेलेले सोन्याचे दागिने फिर्यादी महीलेस परत