अष्टापूर ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी विजय कोतवाल तर उपाध्यक्षपदी प्रशांत कोतवाल यांची निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

अष्टापूर (ता.हवेली) महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी विजय कोतवाल यांची निवड तर उपाध्यक्षपदी प्रशांत कोतवाल यांची निवड करण्यात आली. अष्टापूर ग्रामपंचायतच्या वतीने ऑनलाइन ग्रामसभा घेण्यात आली यामध्ये सदरची तंटामुक्ती समितीची निवड केली.

यावेळी सरपंच कविता योगेश जगताप, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, उपसरपंच विकास कोतवाल, ग्रामसेविका जोशना बगाटे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कोतवाल आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Previous articleबेकायदेशीर गोमांस वाहतूक करणाऱ्या वर नारायणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल
Next articleनंदकिशोर घोडके यांची निवड