तब्बल चाळीस वर्षांपासून फरार असणारा दरोडेखोर जेरबंद

अमोल भोसले-पुणे ग्रामीण पोलिसांना तब्बल ४१ वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या अंकुश माणिक गायकवाड या दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,रेकाँर्ड वरील गुन्हेगार अंकुश गायकवाड हा करमाळा खडकी रोडवर जनावरे चरायला घेऊन फिरत असताना त्याला ताब्यात घेतले. यवत पोलिस ठाण्यात ४१ वर्षांपूर्वी दाखल असलेल्या  गुन्ह्याची कबुली गायकवाड याने दिली.

ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, पो.उप निरीक्षक शिवाजी ननवरे, पो.हवा विजय कांचन, पो कॉ तब्बल चाळीस वर्षांपासून फरार असणार दरोडेखोर जेरबंद जाधव, पो कॉ दगडू विरकर यांनी केली आहे.पुढील तपासासाठी यवत पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

Previous articleमहाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघातर्फे खा.सुप्रिया सुळे यांना निवेदन
Next articleलंडन मध्ये भारतीय युवकांनी साजरा केला गणेशोत्सव