लंडन मध्ये भारतीय युवकांनी साजरा केला गणेशोत्सव

नारायणगाव (किरण वाजगे)

सातासमुद्रापलीकडे देखील हिंदू संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने, पारंपरिक हिंदू सणांची ओळख जगाला माहित होण्याच्या उद्देशाने तसेच भारतीय सण साजरे करून जगाला आदर्श अशी हिंदू संस्कृती दाखविण्याचा प्रयत्न भारतातील काही युवक गेली नऊ वर्ष गणेश उत्सव साजरा करून करताहेत.


लंडनमधील हौनस्लो मध्ये भारतातील विविध भागातील गणेश भक्त गेली नऊ वर्षांपासून उत्साहात व भक्तिभावात गणेशोत्सव साजरा करताहेत.
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील भूमिपुत्र सागर कुलकर्णी यांनी २०१३ साली स्थापन केलेल्या राजे श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान गणेश मंडळाने दीड दिवसाच्या गणरायाचे ची स्थापना करून कोवीडच्या परिस्थितीत देखील गणरायाची स्थापना केली.

लंडन परिसरामध्ये नोकरी व व्यवसाय निमित्ताने सध्या वास्तव्य करणारे योगेश गोडसे, प्रियांका गोडसे, ओवी गोडसे, अतुल पवार, मोनिका पवार, नीरज भापकर, प्रवीण कदम, श्वेता कदम, इश्कू कदम, राकेश राणे, कीर्ती राणे, विशाल नानावकर, अमिता नानावकर, अनुज, ऋतिका, रोहित वारे, स्नेहा वारे, कमलेश राठोड, कनिष्का राठोड, अनुप गायकवाड, साक्षी गायकवाड, शिरीष दराडे, कांचन दराडे, अशितोष जगताप, रुपाली जगताप, यतीन खाडे, प्रिया खाडे, अमोल, केतकी, आकाश आवारी, अनुजा आवारी, अरीण आवारी, अन्वी, आवारी, वैभव खांडगे, प्रतिक्षा खांडगे, आकाश झूनरे, लीना झुनरे, सचिन पिंगळे, रूपाली पिंगळे, विजय ठाकूर, अश्विनी ठाकूर, गणेश इलग, राहुल भुजबळ, समर्थ कृषव, मयूर सावंत, रोहिणी सावंत, जय गांधी, दिनेश, अजय, श्रीकांत जाधव, पल्लवी जाधव, आदी भारतीय गणेश भक्तजन श्री गणेश स्थापना व विविध कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Previous articleतब्बल चाळीस वर्षांपासून फरार असणारा दरोडेखोर जेरबंद
Next articleशिवराज ग्रुपच्या सामाजिक कार्याचा वर्ल्ड बुक रेकॉर्ड लंडन तर्फे सन्मान