आळंदीत मनसेचे घंटानाद आंदोलन

आळंदी- राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत, यासाठी नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठिकठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरासमोर आळंदी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.

मंदिरांवर अनेक छोटे मोठे व्यावसायिक अवलंबून आहेत. त्यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. जेंव्हा सर्वसामान्यांचे प्रश्न येतात तेंव्हा कोरोना येतो आणि सरकारच्या सोयीच्या वेळी कोरोना जातो असं आळंदी शहराचे मनसेचे अध्यक्ष अजय तापकीर यांनी म्हटले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, रवींद्र गारुडकर, कामगार सेना जिल्हाध्यक्ष मनोज खराबी, तालुकाध्यक्ष संदीप पवार, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष तुषार बवले, उपाध्यक्ष मंगेश सावंत, शहराध्यक्ष अजय तापकीर, विध्यार्थी सेना शहर अध्यक्ष मंगेश काळे, उपशहराध्यक्ष वैभव काळे, गणेश गायकवाड, शहर संघटक सागर बुर्डे, विभाग अध्यक्ष मंगेश कुबडे, आधार भामरे, सचिव कुणाल खोलपुरे, महाराष्ट्र सैनिक ज्ञानेश्वर वाढेकर, ऋषिकेश सानप, अशोक पुरी, ललित राणे, अभिजित गुंड, भरत दांगट, यश पाटील, योगेश मोरे, महादेव डेबरे, ज्ञानेश्वर दुगाने, मोहन शिंदे, विजय घोडगे, तेजस नागरगोजे, आणता इंगळे, आणता तळपदे, एकनाथ डोगरे, महादेव खेरडेकर आदी उपस्थित होते.

Previous articleमहा आवास ग्रामीण पुरस्काराचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते वितरण
Next articleचंद्रकांत वारघडे यांचे वृक्षरोपणाचे काम कौतुकास्पद दिपक खलाने वनपरीक्षेत्र अधिकारी