चंद्रकांत वारघडे यांचे वृक्षरोपणाचे काम कौतुकास्पद दिपक खलाने वनपरीक्षेत्र अधिकारी 

अमोल भोसले,पुणे

चंद्रकांत गोविंद वारघडे यांचे वृक्षरोपणाचे काम कौतुकास्पद “आई” कमल गोविंदराव वारघडे यांच्या पंचाहत्तरी निमित्ताने बकोरीचे डोंगरावर ७५ जातीची ७५० देशी झाडे वृक्षरोपणा कार्यक्रमात वनपरिक्षेत्र अधिकार दिपक खलाने ते बोलत होते .

बकोरीचे डोंगरावर माहिती सेवा समिती व दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान यांचे माध्यमातून २२ मार्च २०१७ पासून वृक्षरोपणाचे काम चालू आहे. आज अखेर २५००० देशी झाडे लावून त्याचे संघोपण वारघडे परिवार नियमित करत आहे. त्यासाठी त्यांना ईतर सहयोगी संस्था नेहमीच मदत करत असतात त्यामध्ये श्री समर्थ प्रतिष्ठान वाघोली,वाय टी जी एस सोसायटी पुणे, शिरुर हवेली वॉकिंग गृप ,आर्ट ऑफ लिव्हिंग ,सौधागर प्राॅपरटीज, बकोरी ग्रामस्थ व अनेक वृक्षप्रेमीनी या कार्याला सहकार्य केल्याचे समीतीचे पदाआधिकारी विजय गाडुते यांनी सांगितले .

 बकोरी देवराई वनराई प्रकल्पास समक्ष पाहणी करुन योग्य ती मदत करण्याचे आव्हान मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष शरदराव पाबळे यांनी केले. आज वृक्षमित्र चंद्रकांत गोविंद वारघडे यांची आई कमल गोविंदराव वारघडे यांची पंचाहत्तरी बकोरीचे डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले त्याठिकाणी ७५ जातीची देशी ७५० झाडे लावण्यात आली त्याचप्रमाणे वाघोलीतील उद्योजक समीर भाडळे यांनीही त्याचे वाढदिवसाच्या निमित्ताने ७५० झाडे दिली होती त्याचेही वृक्षरोपण करण्यात आले.

    सदर कार्यक्रमासाठी शोर्य अकॅडमी वाघोली येथील १५० विध्यार्थी उपस्थित होते त्याचप्रमाणे दिपक खलाने वनपरीक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण पुणे, मुकेश सनस वनपरीक्षेत्र अधिकारी वनविभाग पुणे, मंगेश सपकाळ वनपाल लोणी काळभोर, बी.एस.वायकर वनरक्षक वाघोली,त्याचप्रमाने वनकर्मचारी बाप्पु बाजारे, जालींदर जाधव, शिवले हे वनविभागाचे आधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 त्याचप्रमाणे राजेंद्र खांदवे पाटील उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी , विकास दांगट मा.नगरशेवक पुणे, प्रकाश हरपळे, भरत कुंजीर,विजय गाडुते, दिपक गाडुते, संपत बहिरट, वृक्षप्रेमी धर्मराज बोत्रे, सचिन कोतवाल प्राचार्य शंकरराव ऊरसाळ विध्यालय खराडी, माऊली हरगुडे, माहिती सेवा समितीचे सागर इंगळे ,शरद टेमगीरे, रमेश उंद्रे उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ,संतोष शिवले मा.सरपंच तुरापुळ ,वृक्षमित्र उद्योजक सागर भाडळे , शेखर पाटील शिव व्याख्याते, भानुदास सरडे उपाध्यक्ष ग्राहक पंचायत पुणे, डाॅ संपत शिंदे , अॅड शिवाजी वाळके, संदिप कोलते, संदिप डाफळ, सकाळ चे पत्रकार शरदराव पाबळे , लोकमतचे पत्रकार सुरेश वांडेकर, सचीन धुमाळ, स्टार महाराष्ट्र न्युज चे पत्रकार ज्ञानेश्वर पाटेकर, गणेश सातव, गणेश जाधव अध्यक्ष शिवसमर्थ प्रतिष्ठान, ज्यांची पंचाहत्तरी होती त्या कमल वारघडे, धनश्री वारघडे,धनराज वारघडे, कल्याणी शिवतारे ,माया वारघडे, गणेश पवार, नंदु गेजगे, संदिप फीटर, उद्योजक विशाल बहीरट, सतीश जगताप, कमलेश बहीरट अध्यक्ष हवेली तालुका माहिती सेवा समिती अशाप्रकारे शेकडो वृक्षप्रेमी उपस्थित होते.

यापुढे ५ लक्ष्य झाडे लावण्याचा संकल्प असल्याचे चंद्रकांत गोविंद वारघडे यांनी सांगितले व सर्वानी मदत करण्याचे आव्हान वारघडे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली .

Previous articleआळंदीत मनसेचे घंटानाद आंदोलन
Next articleमूल्यशिक्षण काळाची गरज- ज्योती दवणे