वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शुभम वलटे यांनी अंगणवाडीतील बालकांना केली मदत

अमोल भोसले,उरुळी कांचन

अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा खूप मोठा इव्हेंट झाला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने खूप मोठा खर्चही केला जातो. उरुळी कांचन (ता. हवेली) येथील भाजप सोशल मीडियाचे शहराध्यक्ष शुभम बाळासाहेब वलटे यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून इरिगेशन कॉलनी अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना खाऊ आणि जेवणाचे डबे वाटप केले. तसेच पर्यावरण पूरक आंब्याची झाडेही वाटप करण्यात आली.

वाढदिवस साजरा करताना नागरिक विनाकारण अवाढव्य खर्च करत असतात. हा अनावश्यक खर्च टाळून आपण समाजासाठी काही तरी देणे असते. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत शुभम वलटे यांनी हा उपक्रम राबविला.

दरम्यान, शुभम यांनी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून खूप चांगला उपक्रम राबवून समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे. तसेच यातून शुभम यानी ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेशही दिला. शुभम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे सर्वांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

यावेळी अंगणवाडी शिक्षिका सुनंदा खेडेकर, भारतीय जनता पार्टी हवेली तालुका सांस्कृतिक अध्यक्ष सुनील तुपे, शहर विद्यार्थी आघाडी भारतीय जनता पार्टी अध्यक्ष उरुळी कांचन ऋषिकेश शेळके, आदेश तुपे, अमित तुपे, रुतिक तुपे, गणेश कांबळे, शंकर भालेराव, रोहित जगताप, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, पालक आदि मान्यवर उपस्थित होते.

Previous articleतुरूंगात गेला तर कोट्याधीश असून उपयोग नाही- डॉ. श्रीमंत कोकाटे
Next articleमंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणारे व शेतकऱ्यांच्या मोटारी चोरणारे अट्टल चोरटे जेरबंद