तुरूंगात गेला तर कोट्याधीश असून उपयोग नाही- डॉ. श्रीमंत कोकाटे

अमोल भोसले,पुणे

” तुम्ही कोठ्याधीश असला तरी जर तुम्ही भांडण करून तुरुंगात गेलात, तर तुम्हाला अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागते आणि तुरुंगात गेल्यानंतर तुम्ही आपल्याला जन्म देणाऱ्या आई वडिलांना, आपली अत्यंत आवडती पत्नी, आपली आवडती मुलं, मित्रपरिवार, नातेवाईक यांना देखील भेटू शकत नाही” असे विचार सुप्रसिद्ध वक्ते आणि इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी कोथरूड येथे युवा उद्योजक पैलवान भानुदास आप्पा अमराळे यांच्या रूट रियल्टी या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी काढले.

कोथरूड येथे लोकप्रिय युवा उद्योजक पैलवान भानुदासआप्पा अमराळे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन माजी नगरसेवक बंडूभाऊ केमसे, डॉ. श्रीमंत कोकाटे, माऊली सोनवणे, गणेश भरेकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना डॉ. श्रीमंत कोकाटे पुढे म्हणाले की “पुणे परिघातील जमिनींना प्रचंड किमती आलेलय आहेत, परंतु शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपल्या जमिनी विकू नका, कारण शिवकाळात आपल्या पूर्वजांनी रक्त सांडले, त्याचे जतन केलेले आहे. आज ढाल-तलवारीच्या लढाईला नाही विचारांची लढाई आहे. आज आपल्या मुलाबाळांना दर्जेदार शिक्षण द्या, शिक्षण हीच आजच्या काळातील महत्त्वाची संपत्ती आहेत.”

पुढे ते म्हणाले “संपत्तीवरून, राजकीय संघर्षातून भांडण करू नका. कोणत्याही स्वरूपाच्या हिंसक मार्गाने जाऊ नका. टोळीयुद्ध या बाबी आपल्या व्यक्तिगत जीवनासाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी अत्यंत घातक आहेत. भांडणातून तुरुंगात जावे लागते. कोर्टकचेऱ्या कराव्या लागतात. तुरुंगवास भोगावा लागतो. दोन दिवस कुटुंबापासून दूर राहिलो तर आपल्याला आई-वडिलांची, पत्नीची, मुलांची, भावांची, बहिणीची आठवण येते. दोन- दोन वर्ष पाच-पाच वर्ष तुरुंगवास झाला तर आपण आपल्या आवडीच्या लोकांना भेटू शकत नाही. आपल्याला पाहिजे त्या वाहनाने फिरू शकत नाही. आपल्याला हवं ते खाऊ शकत नाही. त्यामुळे भांडण करून तुरुंगात बसण्यापेक्षा सर्वांशी प्रेमाने राहा. भांडण करू नका. सर्व पक्षातील मोठे नेते सामान्य लोकांची झुंज लावायला बसलेले असतात. त्यांच्या प्रोत्साहनाला बळी पडू नका. आनंदाने जीवन जगा. जीवनाचा आस्वाद घ्या. तो आस्वाद आपल्या कुटुंबाला द्या”, असे विचार डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी मांडले. याप्रसंगी मुळशी कोथरूड येथील तरुणांचा मोठा समुदाय उपस्थित होता.

Previous articleउरुळी कांचन – कोरेगावमुळ,टिळेकरवाडीत श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात संपन्न
Next articleवाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शुभम वलटे यांनी अंगणवाडीतील बालकांना केली मदत