नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल -पोलीस निरीक्षक विनोद घुगे

दिनेश पवार,दौंड

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे दिलेल्या नियमांचे उल्लंघन करू नये जे कोणी बेशिस्त आणि अवैध कारभार करतील,कायद्याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


सध्या दौंडमध्ये बेशिस्त वाहतूक आणि इतर अवैध धंद्याना आळा घालण्यासाठी दौंड पोलीस सज्ज झाले आहेत.दौंड पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी कारवाईस सुरुवात केली आहे. त्यांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्याचें धाबे दणाणले आहेत.


सध्या दौंडमध्ये बेशिस्त वाहतूक आणि बेफिकीरपणे वाहने चालविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. विशेषतः कुरकुंभ मोरीतून येता-जाता आतमध्ये ओव्हरटेक करणारे,शालिमार चौक,सरपंच वस्ती येथे विनाकारण गाड्या पळवणे असे महाभाग चालक सुद्धा आहेत.तसेच रस्त्याच्या कडेला हातगाडी लावणारे,दुकान,हॉटेल समोर बेशिस्तपणे गाड्या लावणे यांवर नियंत्रण होणे गरजेचे आहे असे सर्वसामान्य जनतेतुन चर्चा होत आहे, त्यामुळे या सर्वांवर नक्कीच पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेब आळा घालतील अशी आशा दौंडकर व्यक्त करीत आहेत.

Previous articleदेविदास भन्साळी यांची महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
Next articleखेडमध्ये ‘ई- पीक पाहणी’ जनजागृती अभियानास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद