कुरकुंभ येथे तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत भक्त निवास इमारतीचे भूमिपूजन

Ad 1

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

कुरकुंभ येथे पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत भक्त निवास इमारतीचे भूमिपूजन पुणे जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य, मा.वीरधवल बाबा जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कुरकुंभ येथील फिरंगाईमाता तीर्थक्षेत्र सर्व भक्तांचे श्रद्धास्थान आहे.

या ठिकाणी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील देखील भक्तगण येत असतात,नवरात्रात सर्व भक्त मोठ्या भक्तीभावाने देवीचा उत्सव साजरा करतात. ग्रामपंचायत व ग्रामस्थ,तर्फे आलेल्या भाविकांना योग्य त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, आता या सुविधा मध्ये भक्त निवास ची अजून एक भर पडली आहे,मा.वीरधवल बाबा जगदाळे यांच्या प्रयत्नातून रुपये 26 लक्ष खर्च करून हे भक्तनिवास सर्व सुविधासह उभारण्यात येत आहे.

यावेळी कुरकुंभ चे सरपंच मा.राहुल भोसले,उपसरपंच मा.आयुब शेख,माजी सरपंच शिवाजीराव भागवत,माजी प्रभारी सरपंच रशीदभैय्या शेख,मा.सनीभाई सोनार,मा.सुनील पवार,फिरंगाईमता मंदिर चे पूजारी मा.राहुल कुलकर्णी, व ग्रामस्थ उपस्थित होते.