चाकणमध्ये कोयत्याने सपासप वार करून ३६ वर्षीय तरूणाचा खून

चाकण – मेदनकरवाडी (ता. खेड, जि. पुणे) येथे एका ३६ वर्षीय तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी दि. २६ जुलै) रात्री नऊ ते साडेनऊचे सुमारास घडली आहे.

राजेंद्र जालिंदर काळे ( वय ३६, रा, सिद्धीविनायक नगर, मेदनकरवाडी, चाकण, ता. खेड, जि.पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र काळे हा सिद्धीविनायक नगर, मेदनकरवाडी येथील आपल्या घराजवळ उभा असताना आलेल्या हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार केले; त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. जागेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काळे याला पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी स्पष्ट केले. हा हल्ला नेमका कुणी व का केला याची माहिती पोलिसांकडून रात्री उशिरा पर्यंत घेण्यात येत होती. खून झालेला युवक हा रिक्षा चालक होता. या थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.घटनेचा तपास चाकण पोलीस करत आहेत

Previous articleकुरकुंभ येथे तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत भक्त निवास इमारतीचे भूमिपूजन
Next articleहुतात्मा राजगुरू महाविद्यालयाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू