“मदत नव्हे कर्तव्य'” वेगरे ग्रामस्थांना समाजातील विविध स्तरांतून जिवनाश्यक साहित्याचे वाटप

वेगरे (ता.मुळशी) – 21 व 22 जुलै रोजी वेगरे गाव व परिसरात झालेल्या अति मुसळधार जोरदार, विक्रमी आणि ढगफुटी सदृश्य पावसाने वेगरे गावचा मुख्य रस्ता बंद होऊन गावातील घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते यासाठी तातडीने पुढाकार घेऊन वेगरे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून समाजातील प्रतिष्ठित मान्यवर व्यक्ती, सामाजिक संस्था,मंडळे व प्रशासनाकडे आवश्यक मदतीसाठी आम्ही हात पुढे केला असता परिस्थितीचे गांभीर्य व तातडीची गरज पाहून वेगरे ग्रामस्थांच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि मदतीला अनेक हात पुढे आले आणि ग्रामस्थांना आवश्यक ती सर्वोतपरी साहित्यरूपी मदत उपलब्ध झाली.

यामध्ये विशेषकरून प्रामुख्याने भोर वेल्हा मुळशीचे कार्यसम्राट संवेदनशील आमदार संग्रामदादा थोपटे, मुळशीचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी परिस्तिथीचे गांभीर्य पाहून तातडीची गरज पाहता सर्वप्रथम तात्काळ मदत उपलब्ध करून दिली .तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गटनेते शांताराम दादा इंगवले, आमदार मा.मुक्ताताई टिळक,माजी सभापती महादेव कोंढरे, नगरसेवक किरण दगडे , पुणे शहर जेष्ठ आघाडी उपाध्यक्ष सतीश कुलकर्णी, आझाद मयूर मित्र मंडळ, गुजरात कॉलनी- कोथरूड, माती गणपती मंडळ ट्रस्ट , नारायण पेठ ,गरुड गणपती मंडळ व सह्याद्री ॲडव्हेंचर इन्स्टिट्यूट पुणे ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, पुणे- महाराष्ट्र प्रांत ,तालुक्यातील 60 समविचारी तरुणांचा शिवसमर्थ पुरुष बचत गट मुळशी, वेगरे ग्रामस्थ पाटील व्हाट्सप ग्रुप, सिद्दी हार्डवेअर भुगाव सचिनदादा दगडे ,सचिन खैरे ,दीपक आबा करंजावणे,गणेश सुतार ,अमित कुडले यांचेही मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले,

सदर साहित्य /मदत जमा करून गरजू कुटुंब वेगरे ग्रामस्थांना लाभार्त्यां पर्यंत पोहचवण्यासाठी सरपंच मींनाथ कानगुडे , सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गुंड, निलेश दुडे, रामचंद्र मरगळे, संतोष आखाडे,वेगरे गाव आपत्ती व्यवस्थापन चे मल्लीक कोकरे ,पोलीस पाटील यमुना भाऊ मरगळे , माजी आदर्श सरपंच भाऊसाहेब मरगळे , अनंता कमळू मरगळे,महादेव कोकरे, बाळू ढेबे रवींद्र गुंड यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.

यावेळी साहित्य उपलब्धतेनुसार 3 टप्यात वेगरेवाडी, लाव्हार्डे व मुगाव ,टेमघर येथे लाभार्त्यांना वाटप करण्यात आले.वेगवेगळ्या झालेल्या कार्यक्रमांना अनेक मान्यवर मंडळी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये आझाद मयूर मित्र मंडळाचे संजय वरपे ,विजय धुमाळ,सागर कडू, राजेंद्र चव्हाण ,नगरसेवक वैभव मुरकुटे,परेश नवले,अमोल कांबळे ,नितीन विरकर, निलेश इजंतकर, कैलास परमार , बाळासाहेब चवले, नितीन जगताप ,उद्योजक अनिल नाईक ,माती गणपती मंडळाचे सुहास मंचे,शुभम आधवडे, अमोघ जोशी ,गरुड गणपती मंडळ व सह्याद्री एडवेंचर ग्रुपचे राहुल कुंजीर ,अभिजीत उभे(मूळशीकर ),अभिजित कुंजीर,संजय उभे,हंबीरराव कुंजीर, मनोहर लोफगे ,माधुरी शेलार, पुणे शहर ज्येष्ठ आघाडीचे सतीश कुलकर्णीप्रदीप भागवत ,सचिनदादा दगडे, शिवाजी उभे ,दत्ता झोरे, दत्तात्रेय काळभोर ,समीर शिंदे, भूगावचे उपसरपंच विशाल भिलारे, टेमघर च्या सरपंच रेणुका मरगळे ,यांच्यासह लाभार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भाऊ मरगळे म्हणाले जमा झालेली मदत वेगरे ग्रामस्थांना वाटप करून जास्तीचे साहित्य शेजारच्या टेमघर येथील मुऱ्हा – खरब या धनगर वस्ती वस्तीवरील 20 कुटुंबांनाही वाटण्यात आले, या पुढील काळात साहित्य उपलब्धतेनुसार वेल्हे व मोशे खोऱ्यासह अन्य ठिकाणच्या गरजु व्यक्तीं पर्यंत आम्ही मदत पोहोचवणार असून वेगरे गावच्या रस्त्या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा चालू ठेवणार आहोत.

Previous articleउत्तम कार्य करणा-यांचा स्व.संतोष पवार उत्कृष्ट जिल्हा प्रसिध्दी प्रमुख” पुरस्काराने सन्मानित करणार- एस.एम.देशमुख
Next articleसंसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याकडून अजय हिंगे यांना वाढदिवसाला व्हिलचेअरची अनमोल भेट