सावित्रीबाई फुले महिला विकास संस्थेच्या वतीने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर फळझाडांचे वाटप

नारायणगाव (किरण वाजगे)

सावित्रीबाई फुले महिला विकास संस्था व इंद्रधनू ग्रुप यांच्या वतीने नारायणगाव व वारूळवाडी परिसरात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कलमी केशर आंब्याची रोपे तसेच जांभूळ व कोकणी फळांची रोपे भेट देण्यात आली. ही रोपे वर्षभर जगवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार असल्याचे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका व माजी जिल्हा परिषद सदस्य राजश्री बोरकर यांनी सांगितले.


या दोन्ही संस्थांच्या वतीने यापुढील काळात आरोग्य विषयी विविध कार्यक्रम, शिबिरे, वृक्ष संवर्धन, स्वच्छता मोहीम आदी विधायक कामे राबविण्यात येणार आहेत.


आरोग्य विषयक विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने डॉ. पल्लवी राऊत, डॉ. स्मिता डोळे तसेच इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

वरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या संस्थापिका राजश्री बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शरद सहकारी बँकेच्या संचालिका पुष्पा जाधव, वैजयंती कोऱ्हाळे, सुजाता डोंगरे, निर्मला गायकवाड, जुई बनकर, शैलेजा भोसले, जैनाब पिंजारी, ज्योती हांडे, शितल ठुसे व जिजामाता महिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सुरेखा वाजगे यांनी परिश्रम घेतले.

Previous articleसावित्रीबाई फुले महिला विकास संस्थेच्या वतीने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर फळझाडांचे वाटप
Next articleनारायणगाव ग्रामपंचायतीच्या माजी महिला सरपंच व ग्रामविकास अधिकार्‍याला अटक