अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीच्या दुरूस्तीसाठी सात जेसीबी मशीन देणार : शिवसेना जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांचा दिलासा

राजगुरूनगर :महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुका शिवसेना, युवासेना व बाबाजी काळे मित्र मंडळ वतीने खेड तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या जोरदार पावसात नुकसान झालेल्या भात शेतीच्या दुरुस्तीसाठी सात जेसीबी यत्रं नुकसानग्रस्त शेतक-यांना पुरवण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा परीषदेचे सदस्य बाबाजी काळे यांनी केली.

याप्रसंगी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, गटविकास अधिकारी अजय जोशी, बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश कानडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ. बळीराम गाढवे, पंचायत विस्तार अधिकारी जी. पी. शिंदे, आदिवासी विभागाचे तालुका समन्वयक गणेश गावडे यांसह प्रकाश सातपुते, शहर युवासेना प्रमुख संतोष राक्षे, विभागप्रमुख राहुल मलघे, संतोष पानसरे, अनेक गावांचे सरपंच, तलाठी ,ग्रामसेवक उपस्थित होते.

गेल्या आठवड्यात पावसाने पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकण मिळुन ९ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दरड कोसळुन यामध्ये अनेकजण मृत्युमुखी पडले तर शेतीजमीनीसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भातपिकासह शेतजमीनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पहावयास मिळतात.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्वव ठाकरे यांचा २७ जुलै रोजीचा होणारा वाढदिवस शिवसैनिकांनी बँनरबाजी न करता राज्यावर आलेल्या आपत्ती संकटात सापडलेल्या बाधंवासाठी मदतीचा हात देण्याचे आवाहन केले होते.

शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुका शिवसेना आणि बाबाजी काळे मित्रमंडळ यांच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार तालुक्यातील पश्चिम भागातील तीन खो-यात झालेल्या गोरगरीब शेतक-यांसाठी ज्यांचे शेतजमीन पुन्हा दुरुस्त करण्याची आर्थिकदृष्ट्या शक्य होणार नाही. अशा शेतक-यांची निवड करुन भात शेतीची कामे उरकल्यानंतर भात खाचरातले पाणी हटल्यानंतर सात जेसीबी अशा शेतक-यांच्या मदतीला देण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा परीषदेचे सदस्य बाबाजी काळे यांनी पश्चिम भागात नुकसानग्रस्त मंदोशी गावची जावळेवाडी आणि एकलहरे गावाला भेट देऊन पहाणी करताना शेतक-यांच्या उपस्थित केली.

Previous articleपुणे – शिरुर रस्त्यावरील दुमजली पुलाच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी ७२०० कोटी रू. मंजूर
Next articleपुणे शिरुर रस्त्यावरील दुमजली पुलाच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी ७२०० कोटी मंजूर ; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश