अवैद्य दारू विक्री प्रकरणी हॉटेल मालकासह दोघांवर गुन्हा दाखल

नारायणगाव (किरण वाजगे)

शिरोली सुलतानपूर (ता. जुन्नर) येथील गावठी कट्टा या हॉटेल च्या पाठीमागे अवैधरित्या दारू विकणाऱ्या एकावर व हॉटेलच्या मालकावर नारायणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.

याबाबत रामजीत मानोराम निशाद (वय २३, राहणार शिरोली सुलतानपूर तालुका जुन्नर, मूळ राहणार सारैया, मल्लेपुर, तालुका भीटी, जिल्हा फैजाबाद, उत्तर प्रदेश) हा कामगार त्याचे हॉटेल मालक रविंद्र रामकृष्ण पठाडे (राहणार साळवाडी, तालुका जुन्नर) यांच्या सांगण्यावरून हॉटेल गावठी कट्टा च्या पाठीमागे देशी विदेशी दारू ची विक्री करताना आढळला. त्याच्या ताब्यातील सुमारे ३४०० रुपयांची दारू तसेच एकवीस हजार चारशे दहा असे एकूण पंचवीस हजार ७७ रुपये रोख रक्कम मिळून आली. यातील आरोपी रामजीत निशाद याला अटक करून जुन्नर न्यायालयात हजर करण्यात आले.
ही कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, पोलीस नाईक धनंजय पालवे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोबल, नवीन अरगडे यांनी पार पाडली. या घटनेचा तपास पोलीस नाईक रामचंद्र शिंदे हे करीत आहेत.

Previous articleकोरोना साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी आपल्या जीवनशैलीत बदल करावा- पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक
Next articleसर्वांच्या शुभेच्छांमुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत;अधिक समर्पित होऊन काम करण्याचे बळ मिळाले- अजित पवार