कोरोना साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी आपल्या जीवनशैलीत बदल करावा- पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक

 1. दिनेश पवार-दौंड (प्रतिनिधी)

 2. दिवसेंदिवस कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी आपल्या जीवनशैलीत बदल केले पाहिजे दौंड पोलीस ठाणे हद्दीत व दौंड शहर अंतर्गत कोरोनाची लिंक तोडायची असेल तर खालील गोष्टी प्रत्येकाने पाळल्या पाहिजे.असे मत दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी व्यक्त केले,प्रत्येकाने खालील गोष्टी करण्याची आज शपथ घेऊया,असे आवाहनही सुनिल महाडिक यांनी नागरिकांना केले आहे.

 3. 1- आठवड्यातून एकदाच बाजार व किराणा भरेल.

  2- कोणत्याही नातेवाईकांना जे कुटुंबात राहत नाही व मित्रांना फक्त फोनवर भेटेल.

  3-कोणत्याही व्यक्तीला स्पर्श करणार नाही.

  4.- बाहेर पडायची वेळ आली तर कोणत्याही परिस्थितीत मास्क काढणार नाही.

  5 – हॅन्ड सॅनिटायझर चा वारंवार वापर करेल.

  6.- दूरच्या नातेवाइकांच्या मित्रांच्या वाढदिवस व लग्नाला जाणार नाही मात्र मोबाईल वरून शुभेच्छा देईल.

  7. – दूरच्या नातेवाईकांच्या मयत कार्यक्रमात उपस्थित राहणार नाही परंतु त्यांना मोबाईलवरून मानसिक आधार निश्चितपणे देईल.

  8. – कोणत्याही परिस्थितीत मानसिक संतुलन बिघडू देणार नाही.

  9. – दवाखान्यांमध्ये कोणत्याही नातेवाईकांना भेटायला जाणार नाही परंतु आर्थिक मदत लागली तर जरूर करेल.

  10. – परमेश्वरावर निश्‍चितपणे श्रद्धा ठेवील परंतु सार्वजनिक ठिकाणी मंदिरात मज्जीद गुरुद्वारा जाणार नाही.

  11. – मोटर सायकलवर डबलसीट जाणार नाही कारमध्ये तीन पेक्षा जास्त लोक असतील तर जाणार नाही.

  12.- कोमट पाण्याने सारखा गुळण्या करेल.

  13.- ग्रीन टी दिवसातून दोन ते तीन वेळा घेईल.

  14. – काही शंका आल्यास स्वतःची ऑंटीजीन टेस्ट करून घेईल आता मेडिकलमध्ये किट आलेले आहेत.

  15. – काही लक्षणे स्वतःला वाटू लागल्यास स्वतःला इतरांपासून दूर ठेविल. सार्वजनिक दुकान भाजीपाला व इतर आस्थापना चालवत असेल तर ती घरात कुणी आजारी असल्यास किंवा स्वतः आजारी असल्यास कोणत्याही परिस्थितीत उघडणार नाही.

  16. – सर्वांपासून सहा फूट अंतरावरून बोलेल

  17. – एकत्र जेवण करणार नाही सार्वजनिक ठिकाणी अन्नसेवन करणार नाही

  18.- हॉटेलचा चहा नाश्ता जेवण टाळेल

  19. – सार्वजनिक रीत्या मध्यपान करणार नाही

  हे सर्व आपण दौंडकर म्हणून करूया कोरोना लिंक निश्चितपणे आजपासून आठ दिवसात तुटलेली असेल व दौंड नक्कीच कोरोना मुक्त होईल.

  असा विश्वास पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी व्यक्त केला

Previous articleसहायक पोलीस निरीक्षक निलेश खेडकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा अधिकारी या पदासाठी निवड
Next articleअवैद्य दारू विक्री प्रकरणी हॉटेल मालकासह दोघांवर गुन्हा दाखल