भोर तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी बिनविरोध अध्यक्षपदी वैभव भूतकर

अमोल भोसले,उरुळी कांचन

४ जुलै २०२१ ते ३ जुलै २०२३ या दोन वर्षाच्या मुदतीसाठी घेण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या नऊ जागांसाठी प्रत्येकी एक असे नऊच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल जगताप यांनी जाहीर केले. यावेळी एम.जी.शेलार यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.


पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न भोर तालुका पत्रकार संघाची आज द्विवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली

नवीन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य पुढील प्रमाणे अध्यक्ष वैभव नरहरी भूतकर, उपाध्यक्ष संतोष भगवान म्हस्के व माणिक बाबासो पवार,
सरचिटणीस (सचिव) स्वप्निलकुमार पैलवान , कोषाध्यक्ष (खजिनदार) किरण काळूराम दिघे, तर कार्यकारिणी सदस्यपदी सूर्यकांत पांडुरंग किंद्रे, नितीन वसंत धारणे, चंद्रकांत सिताराम जाधव व किरण महादेवराव भदे यांची बिनविरोध निवड झाली.

तसेच तालुका समन्वयक म्हणून दत्तात्रय दिनकर बांदल यांची निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, परिषदेचे कार्याध्यक्ष शरदजी पाबळे, विभागीय सचिव बापूसाहेब गोरे , जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर, निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा समन्वयक सुनिल जगताप व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा परिषद प्रतिनिधी एम.जी.शेलार यांनी अभिनंदन केले.

Previous articleउरुळी कांचन – ग्रामस्वच्छता अभियानचे काम कौतुकास्पद – महंत विद्याद्यर शहापूरकर
Next articleखासदार डॉ.अमोल कोल्हे तसेच आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नाने कोरेगावमुळला नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात आला-सरपंच विठ्ठल शितोळे