खासदार डॉ.अमोल कोल्हे तसेच आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नाने कोरेगावमुळला नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात आला-सरपंच विठ्ठल शितोळे

अमोल भोसले,उरुळी कांचन

कोरेगावमुळ (ता.हवेली) येथील गोळीबार मैदान, आनंदवन सोसायटी येथील ग्रामस्थांना सातत्याने कमी व्होल्टेज मिळत असल्याने महावितरण उरुळी कांचन उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या
कोरेगावमुळ गावाला नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात आला. याबाबत सरपंच विठ्ठल शितोळे, उपसरपंच मनिषा कड, ग्रामपंचायत सदस्य भानुदास जेधे, अश्विनी कड, पोलीस पाटील वर्षा कड, माजी चेअरमन अमित सावंत याच्या पाठपुराव्याने तसेच खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नातून येथे १०० केव्ही होर्टचा नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात आला.


कोरेगावमुळ ग्रामपंचायतच्या वतीने तसेच ग्रामस्थांनी खासदार – आमदार – महावितरणचे प्रशासकीय अधिकारी – कर्मचारी वर्गाचे विशेष आभार मानले.

याप्रसंगी महावितरण कंपनी अधिक्षक पुणे ग्रामीण अभियंता राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदिले, महावितरण उरुळी कांचन उपविभाग कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता प्रदिप सुरवसे, तेजेस झोडगे, योगेश इंगळे, प्रदीप जाधव यांचे सहकार्य लाभले.

 सरपंच विठ्ठल शितोळे, उपसरपंच मनिषा कड, ग्रामपंचायत सदस्य भानुदास जेधे, दत्तात्रय काकडे, माजी चेअरमन अमित सावंत, आप्पा कड, नितीन कड, गणेश शितोळे, सचिन कड, नंदकिशोर कड, प्रा.सुरेश वाळेकर, चिंतामणी कड, कचरु कड, नितीन थोरात, शरद गोते, प्रताप पांडुरंग कड आदी मान्यवरांच्या हस्ते नवीन ट्रान्सफार्मरचे औपचारिकता उद्घाटन करण्यात आले.

Previous articleभोर तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी बिनविरोध अध्यक्षपदी वैभव भूतकर
Next articleराजेगांव मध्ये राजेश्चर ऑक्सीजन पार्क