उरुळी कांचन – ग्रामस्वच्छता अभियानचे काम कौतुकास्पद – महंत विद्याद्यर शहापूरकर

अमोल भोसले,उरुळी कांचन

ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियानचे काम कौतुकास्पद आहे. या गुप्रच्या माध्यमातून सातत्याने समाज उपयोगी नवनवीन संकल्पना राबविल्या जातात यांचा आजच्या तरुण वर्गाने आदर्श घेणे आवश्यक असल्याचे मत कोरेगावमुळ श्रीकृष्ण महानुभाव मंदिराचे संचालक महंत विद्याद्यर शहापूरकर यांनी व्यक्त केले.

कोरेगावमुळ (ता.हवेली) येथील श्रीकृष्ण मंदिर ते कोरेगावमुळ गावापर्यंत मुख्य रस्त्याच्या आत मध्ये पश्चिम बाजूने वड, पिंपळ, जाभूंळ, चिंच अशा विविध प्रकारच्या ४० वृक्षांचे वृक्षारोपण स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान गुप्रच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी बालाजी नर्सरी व कृपा नर्सरीने वृक्षदान देऊन विशेष योगदान नोंदवले. उरुळी कांचन ग्राम स्वच्छता अभियान गुप्रचे सर्व सदस्य, सरपंच विठ्ठल शितोळे, उपसरपंच मनिषा कड, पोलीस पाटील वर्षा कड, मा.उपसरपंच धैर्यसिंग शितोळे, माजी सरपंच सदाशिव कोलते, संतोष चौधरी, शांताराम चौधरी, मानसिंग कड, किरण वाझे, महादेव काकडे, शैलेश बाबर, शैलेश गायकवाड, मनोज महाडिक, आशुतोष तुपे, गणपत गायकवाड, प्रा.सुरेश वाळेकर, चिंतामण कड, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी विराज पवार, कर्मचारी, ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले.


युवकामध्ये गावामधील समस्यांची जनजागृती करणे स्वच्छ व सुंदर गाव घडविणे.वृक्षारोपण व संवर्धन करणे. युवकांमध्ये गावविषयी आपलेपणाची भावना निर्माण करणे. आदर्श गाव तयार करणे. वृक्षारोपण व संवर्धन अभियान मार्फत ज्या जागी फक्त कुसळे येत होती. त्याजागी सुमारे दोन हजार झाडे विविध परिसरात लावण्यात आली. त्यांचे संगोपन गेली तीन वर्षांपासून करत असल्याची माहिती संतोष चौधरी यांनी दिली.

Previous articleओटर कंट्रोल इंडिया कंपनी कडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांना मोफत लसीकरण
Next articleभोर तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी बिनविरोध अध्यक्षपदी वैभव भूतकर