राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’ निमित्त डॉक्टरांचा सत्कार

वाढदिवसाच्या जाहिरात

अमोल भोसले,उरुळी कांचन

‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीद घेऊन नागरिकांच्या आरोग्य सेवेत झटणारे डॉक्टर म्हणजे देवदूत. राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्ताने त्यांच्या त्याग, समर्पण आणि लोकसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करुया असे प्रतिपादन पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले. पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेलच्या वतीने ‘डॉक्टर्स डे ‘ निमित्त पुणे शहरात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थितीत डॉक्टर यांना प्रमुख पाहुणे म्हणून जगताप बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे शहर नवीन कार्यालय शिवाजीनगर, डेंगळे पूल, कुंभारवाड्या समोर येथे हा कार्यक्रम शासनाच्या नियमानुसार पार पडला.

याप्रसंगी माजी महापौर तथा पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोवीड काळात, मांढरदेवी दुर्घटनेत मदतकार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार याप्रसंगी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुणे शहराच्या आरोग्यासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार करण्यात आला.

पुणे शहर राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे अध्यक्ष डॉ सुनिल जगताप यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दत्ता गायकवाड, नीता कुलकर्णी, डॉ राजेश पवार, डॉ अजितसिंह पाटील ,डॉ संगीता खेनट ,डॉ राहुल सुर्यवंशी, डॉ हेमंत तुसे, डॉ शशिकांत कदम, डॉ. शंतनू जगदाळे, डॉ.रणजीत निकम, डॉ.पोखरणा, डॉ. देवेंद्र संचेती, डॉ.सिध्दार्थ जाधव, डॉ.विजयसिंह पाटील, डॉ. स्नेहलता ऊंडे, डॉ.राजेश साठे, डॉ.योगेश कदम, डॉ. संगीता कदम, डॉ.संगीता माने, डॉ.प्रताप ठुबे, डॉ. आनंद पाटील, डॉ.नरेंद्र खेनट, डॉ.प्रदीप उरसळ, डॉ. सचिन ढमाले, डॉ.हिरेमठ, डॉ.नितीन ढुमणे, डॉ. सुनील होनराव, डॉ.संदीप बोरकर, डॉ.कृनाल ओसवाल, डॉ.अनुपमा गायकवाड, डॉ.सविता ढमाले, डॉ.ज्योती तुसे, डॉ.कल्पना जाधव, डॉ.शिवानी बोरकर, डॉ.नितीन पाटील, डॉ.लांडे – पाटील, डॉ. मिसाळ, डॉ.लालासाहेब गायकवाड, डॉ.अजित पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.राहुल सुर्यवंशी यांनी केले.

Previous articleआभिनेत्री आसु सुरपूर हिचा चित्रपट अशी ही भन्नाट भिंगरी प्रदर्शित प्रेक्षकांना नक्कीच आवडेल-सुनिल भोसले
Next articleदौड- सरपंच परिषदेच्या वतीने गटविकास अधिका-यांना निवेदन