विवाहित महिलेला “तू मला भेटायला येना, तू मला खूप आवडतेस” असा फेसबुकवर मेसेज पाठवणाऱ्यावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

घोडेगाव ( ता.आंबेगाव ) येथील एका विवाहित महिलेला फेसबुकवर मेसेज पाठवून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याने एका अज्ञात व्यक्ती विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी पीडित महिलेच्या पतीने फिर्याद दिली आहे.दिलेल्या फिर्यादीनुसार पीडित महिला  आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील रहिवासी आहे.१२ ते १५ जुलै या कालावधीत अज्ञात आरोपीने या महिलेला ‘तू माझ्याशी बोलना, तू मला भेटायला येना, तू मला खूप आवडतेस’, असे मेसेज तिच्या फेसबुक मेसेंजरमध्ये पाठवले व तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. अशा प्रकारचे मेसेज तो दररोज करू लागल्यामुळे पीडित महिलेने या सर्व घटनेची माहिती पतीला दिली.त्यानंतर पतीने घोडेगाव पोलीस ठाण्यात घटनेची सविस्तर माहिती दिली असता घोडेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक प्रदीप पवार करत आहेत.

Previous articleउरुळी कांचन ‘च्या महिला सरपंचा विरोधातील अविश्वास ठराव चर्चेला येण्यापुर्वीच रद्द
Next articleजमिनीच्या वादातून पुतण्याची वृद्ध चुलता,चुलतीला बेदम मारहाण