जमिनीच्या वादातून पुतण्याची वृद्ध चुलता,चुलतीला बेदम मारहाण

प्रमोद दांगट : प्रतिनिधी

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खडकी फाटा( ता. आंबेगाव )येथे जमिनीच्या वादातून पुतण्याने चुलता व चुलतीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून याबाबत बबन भिमाजी शेंगाळे (वय ७०)यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बबन शेंगाळे व त्यांची पत्नी खडकी फाटा (ता.आंबेगाव )येथे राहत असून त्यांचा पुतण्या बाळू कोंडीबा शेंगाळे यांच्यात जमिनीचे वाद आहेत. शुक्रवार दि.१७ रोजी फिर्यादी आपल्या घरी असताना सायंकाळी ६ वा च्या सुमारास बाळू शेंगाळे हा घरी आला व म्हणाला जमीन माझ्या बापाने घेतली आहे.तुमचा काही संबंध नाही असे म्हणत त्याने फिर्यादीस शिवीगाळ व हातातील काठीने मारहाण केली.त्यावेळी फिर्यादीची पत्नी जनाबाई ही भांडण सोडविण्यासाठी आली असता तिला नंदा बाळू शेंगाळे हिने दगडाने मारहाण केली त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक गोळा होऊन त्यांनी भांडणे सोडवली. याबाबत बबन भिमाजी शेंगाळे,यांनी बाळू कोंडीबा शेंगाळे,व नंदा बाळू शेंगाळे रा. खडकी फाटा पुनर्वसन ता. आंबेगाव जिल्हा पुणे ) यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक सागर गायकवाड करत आहेत.

Previous articleविवाहित महिलेला “तू मला भेटायला येना, तू मला खूप आवडतेस” असा फेसबुकवर मेसेज पाठवणाऱ्यावर गुन्हा दाखल
Next articleदौंडमध्ये डबल शीट फिरणाऱ्यां वर होणार कारवाई