धक्कादायक-राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची महिलेने धरली कॉलर

इंदापूर – राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदापूरमध्ये संभाजी चव्हाण यांच्याविरुद्ध प्रफुल्ल चव्हाण आणि सचिन तरंगे 394 अंतर्गत दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर संभाजी चव्हाणने प्रफुल्ल चव्हाण आणि सचिन तरंगेवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला.

याबाबत काल प्रफुल्ल चव्हाण आणि सचिन तरंगे कुटुंबातील लोक दत्तात्रय भरणे यांच्या घराबाहेर उपोषणाला बसले होते. प्रफुल्ल चव्हाण हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. प्रफुल्ल चव्हाण हा दत्तात्रय भरणे यांचा निकटवर्तीय आहे.

 

प्रफुल्ल चव्हाण आणि सचिन तरंगे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी पाच लाख रुपये खंडणी मागितली होती. ती न दिल्याने गुन्हा दाखल केल्याचा आरोप प्रफुल्लची आई शोभा चव्हाण यांनी केला आहे. शोभा चव्हाण या रेडणी गावच्या माजी सरपंच आहेत.

पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या निलंबनाची कारवाई व्हावी. यासाठी प्रफुल्लची आई शोभा चव्हाण या दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर उपोषणाला बसल्या होत्या. त्यावेळी यांनी थेट दत्तात्रय भरणे यांची कॉलर पकडली. यानंतर त्यांनी जाब मागितल्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे उपोषण काल दुपारीच मागे घेतले होते. या प्रकरणानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. भरणे हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे. सध्या ते राज्याचे राज्यमंत्री आहेत.

Previous articleनिवडणुकीत अनुचित प्रकार घडल्यास होणार कडक कारवाई -प्रताप माणकर
Next articleसर्वोच्च न्यायालयाचा नविन कृषी कायद्याला स्थगिती देण्याचा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा -जयंत पाटील