नारोडी परीसरात बिबटया व दोन बछड्यांचा धुमाकुळ

सिताराम काळे, घोडेगाव

– नारोडी (ता. आंबेगाव) गावठाणात एक बिबटया व दोन बझडे यांनी रात्री एक वाजण्याच्या सुमारास शेळयांच्या कळपावर धुमाकुळ घालत दोन शेळया ठार केल्या. गावठाणात भर वस्तीत शेळयांवर झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नारोडी परीसरामध्ये मागील चार ते पाच वर्षांपासुन पन्नासहुन अधिक पाळीव जनावरे बिबटयाने फस्त केली आहेत. तर बहुतेक नागरिकांवर प्राणघातक हल्ला देखिल झाले आहेत. दि. ४ रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास नारोडी गावठाणातील आदेश आगलावे यांच्या घराच्या अंगणापुढे असलेल्या शेळयांच्या कळपावर लाईटच्या प्रखर उजेड व कंपाऊड असताना देखील एक बिबटया व दोन बछडे यांनी आत प्रवेश करून दोन शेळया ठार केल्या. आत्ता पर्यंत बिबटयाने आगलावे यांच्या दोन वर्षात १२ शेळया ठार केल्या आहेत.

नारोडी परीसरातील शेतकरी पाणी भरण्यासाठी शेतात गेले असता त्यांना देखील बिबटयाचे व बछडयांचे दर्शन झाले आहे. पाच वर्षांपासुन वनविभागाकडून पिंजरे लावुन देखील बिबटयाला जेरबंद करता आलेले नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Previous articleचाकण- तळेगाव चौकातील वाहतूक कोंडी फुटण्याचा मार्ग मोकळा – खासदार डॉ. अमोल कोल्हे
Next articleनारायणगावमध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्याला अटक