आशा गटप्रवर्तक यांच्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार – खासदार डॉ अमोल कोल्हे

नारायणगाव (किरण वाजगे)

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NRHM ) अंतर्गत कंत्राटी कर्मचा-यांकरिता वेतन सुसूत्रीकरण प्रक्रिया राबविण्यात येत असून यामध्ये आशागटप्रवर्तक (BF) या पदाचा समावेश करण्यात यावा व समान कामासाठी समान वेतन देण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटना जुन्नर तालुका यांच्या वतीने शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांना निवेदन देण्यात आले .

आरोग्य सेवा संचालनालया मार्फत वेतन निश्चितीमध्ये गटप्रवर्तक या पदाचा समावेश करण्यात आलेला नाही. हे पद ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत असून याची नियुक्ती ही शासनाच्या निर्देशानुसार करण्यात आलेली आहे . गटप्रवर्तक या आपल्या ग्रामीण भागातील जनतेसाठी आरोग्यदूत म्हणून कार्य करीत असून आशा वर्कर यांच्या माध्यमातून राष्ट्रीय आरोग्य अभियान योजना प्रभावीपणे शेवटच्या जनसामान्यापर्यत नेण्याचे काम आशा गटप्रवर्तक करीत आहे .

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” उपक्रमांतर्गत गावोगावी व घरोघरी मोफत आरोग्य तपासणी केली असून कोविड१९ चा प्रार्दूभाव नियंत्रणात आणण्यात आशा वर्कर व आशागट प्रवर्तक यांचा महत्त्वाचा वाटा आहे या मागण्यांचे निवेदन खासदार डॉ अमोल कोल्हे व जुन्नर तालुक्याचे आमदार अतूल बेनके यांना देण्यात आले. यावेळी खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकार व केंद्रिय आरोग्यमंत्री यांच्यासमोर आशा गट प्रवर्तक यांच्या मागण्या मांडून समान कामासाठी समान वेतन मिळून देण्याकरिता मी प्रामाणिक प्रयत्न करीन असे आश्वासन आशा गट प्रवर्तक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

तर आमदार अतूल बेनके यांनी महाराष्ट्र शासन दरबारी हा प्रश्न गांभीर्याने मांडून त्यावर लवकरच योग्य तो निर्णय घेण्यास सरकारला विनंती करू अस सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य पांडूरंग पवार, आशा गट प्रवर्तक पूनम मनसुख, मंजूश्री पानसरे, वरदा वारूळे, स्नेहल चव्हाण, दिपाली थोरात, मनिषा खालकर, सुरेखा दिघे, ज्योती पांडे, संजिवनी गायकवाड, सविता कुऱ्हाडे, सुनिता डेरे,  स्वरूपा उंडे, सुप्रिया खिलारी आदी आशागट प्रवर्तक व मान्यवर उपस्थित होते

Previous articleशिक्षण महर्षी … तात्यासाहेब गुंजाळ यांचे निधन
Next articleपुणे -नाशिक महामार्गाला पडलेल्या खड्यांवरून मनसे आक्रमक