पुणे -नाशिक महामार्गाला पडलेल्या खड्यांवरून मनसे आक्रमक

नारायणगाव(किरण वाजगे)

 पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा ते अवसरी फाटा या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.रस्त्यावर पडलेल्या खड्यांमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी झाडे लावली तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. पुढील आठ दिवसांत पूर्ण महामार्गावरील खड्डे बुजवले नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या वेळी देण्यात आला.

  याप्रसंगी मनसे चे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे, माहिती अधिकार महासंघाचे अध्यक्ष तानाजी तांबे, तालुका अध्यक्ष साईनाथ ढमढेरे, तालुका उपाध्यक्ष दिलीप खिलारी, सतिश पाटील औटी, माऊली हडवळे, विशाल डुंबरे, कुणाल कणसे , तालुका महिला अध्यक्षा संगिता अडसरे , मयूर वाळूंज आदी मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleआशा गटप्रवर्तक यांच्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार – खासदार डॉ अमोल कोल्हे
Next articleनिरगुडसर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा गटप्रवर्तक गितल गावडे यांची कोरोनावर मात