ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत नारायणगांव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

नारायणगांव (किरण वाजगे)
नारायणगाव (ता. जुन्नर) येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमान्तर्गत विविध कृषी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यामध्ये शेतीसाठी आवश्यक असणारी विविध पीक पद्धती, शेतीसाठी आवश्यक असणारे योग्य नियोजन, कृषी विषयक तंत्रज्ञान, जागतिक शेती विषयी आधुनिक तंत्रज्ञान पद्धती अभ्यासली जात आहे.
यामध्ये सेवा संस्कार संस्थेच्या श्रमशक्ति कृषी महाविद्यालयाची कृषी कन्या निशीगंधा शेखर कोल्हे ही विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना मदत करणार आहेत.

दोन महिन्यांच्या प्रकल्प काळात, शेतकऱ्यांना माती परीक्षण, त्यावर आधारीत खत व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान, पशुपालन, शास्रशुद्ध पद्धतीने फळबाग लागवड, जनावरांना लसिकरण, बीज प्रक्रिया मूल्यवर्धित उत्पादने आदी बाबतीत मार्गदर्शन करण्यात येत आहे. या साठी प्रकल्प अधिकारी व शिक्षक संयोजन करत आहेत.

कृषि कार्यानुभव या उपक्रमासाठी श्रमिक उद्योग समूहाचे अध्यक्ष तसेच सेवा संस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साहेबरावजी नवले पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एल. हारदे, कार्यक्रम समन्वयक प्रा.एन.बी.शिंदे, प्रा.एस. एम. कानवडे व प्रा.टी. डी. साबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Previous articleराजे शिवछत्रपती मित्रमंडळाने विसर्जन स्थळी गर्दी होऊ नये म्हणून गणेश भक्तांच्या घरोघरी जाऊन केले मूर्तींचे संकलन
Next articleनिखिलभैया युथ फाउंडेशच्या गणेश मूर्ती संकलनाच्या आवाहनास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद