निखिलभैया युथ फाउंडेशच्या गणेश मूर्ती संकलनाच्या आवाहनास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

अमोल भोसले, उरुळी कांचन – प्रतिनिधी

गणपती बाप्पा मोरया…. पुढच्या वर्षी लवकर या….. गणपती चालले गावाला…. चैन पडेना आम्हाला….. या घोषणा प्रामुख्याने करण्यात आल्या. बहुसंख्य गणपती मंडळांनी – नागरिकांनी घरातून बाप्पाला आज निरोप दिला.

कोरोना व्हायरसने थैमान घातलेले आहे. उरुळी कांचन (ता.हवेली) मध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून परिस्तिथी अत्यंत गंभीर आहे अशा पार्श्‍वभूमीवर आपण या वर्षीचा गणेश उत्सव देखील साधेपणाने साजरा केलेला आहे.

गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी करु नये, म्हणून निखिलभैया युथ फाऊंडेशन तर्फे गणेश मूर्ती संकलन केंद्र ऊरुळी कांचन मध्ये उभारले जाणार आहे असे आवाहन नागरिकांना निखिलभैया युथ फाउंडेशचे अध्यक्ष निखिल कांचन यांनी केले असता उरुळी कांचन पोलीस चौकी जवळ, तळवाडी चौक व आश्रम रोड या तीन ठिकाणी गणेश मूर्तीचे संकलन केंद्र उभारण्यात आले होते.

या सामाजिक उपक्रमास नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला २९५ मूर्ती जमा झाल्या भक्‍तीभावाने या सर्व मूर्ती विसर्जित करण्यात आल्या.

यावेळी सचिन कांचन, शारिक सय्यद, अमोल मेहेर, प्रमोद कांचन, आदेश गिरमे, सुहास चव्हाण सह अन्य सहकारी कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्य लाभले.

Previous articleग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत नारायणगांव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
Next article२५ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याने प्लास्मा दान करून एक नवा आदर्श केला निर्माण