राजे शिवछत्रपती मित्रमंडळाने विसर्जन स्थळी गर्दी होऊ नये म्हणून गणेश भक्तांच्या घरोघरी जाऊन केले मूर्तींचे संकलन

राजगुरूनगर,प्रतिनिधी : राजगुरुनगर शहरात वाडा रोड, चंद्रमा गार्डन येथील राजे शिवछत्रपती मित्रमंडळाने मूर्ती संकलन व विसर्जन या उपक्रमांतर्गत ठराविक स्वयंसेवक कार्यकर्त्यां द्वारे विविध सोसायटी व सर्व गणेश भक्तांच्या घरोघरी जाऊन मूर्ती संकलन केले जेणेकरून शेकडो गणेश भक्तांचे कुटुंबासहित विसर्जन स्थळी येऊन गर्दी होण्याचे टाळले गेले.

 

नागरिकांनी मंडळाच्या या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देत आपल्या घरातील श्रीगणेशाच्या मूर्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे विसर्जनासाठी सुपूर्त केल्या. राजगुरुनगर शहराचा वाढता करोना संसर्ग हा उच्चांक गाठण्याच्या बेतात असला तरीही विसर्जन स्थळावर कमीत कमी गर्दी व्हावी म्हणून मंडळाचा हा प्रामाणिक प्रयत्न होता.


यासाठी मंडळाचे अध्यक्ष अमित घुमटकर,योगेश पवार , विकी खैरनार,संतोष भांगे, सागर खैरनार,अभिषेक भास्कर, अविनाश पाटील,अक्षय तेली, योगेश खैरनार,रेवन घुमटकर, रोनित घुमटकर, शुभम भंडलकर, सचिन मोहिते,गणेश भोजने, आकाश पाटील,सनी जाधव, अजय आहिरे या सर्व कार्यकर्त्यांनी मूर्ती संकलनास मदत केली व विसर्जनस्थळी गर्दी कमी करण्याचा मंडळाचा प्रामाणिक प्रयत्न यशस्वी ठरला.

Previous articleमास्क न लावता फिरणाऱ्यांवर उरळी कांचन परिसरात पोलीसांची कारवाई
Next articleग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत नारायणगांव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन