जुन्नर तालुक्यात आज एकूण ५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यात आज ५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आजपर्यंत आढळलेल्या एकूण ११२४ रुग्णांपैकी ६५८ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.

नारायणगाव येथे आज १५ कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून निमगाव सावा येथे नऊ, बोरी बुद्रुक येथे पाच, येणेरे, वडज, धालेवाडी येथे प्रत्येकी चार, सावरगाव, वडगाव कांदळी, ओतूर येथे प्रत्येकी दोन, डिंगोरे, धोलवड, बारव, आळे, वारुळवाडी व जुन्नर शहर येथे प्रत्येकी एक असे एकूण ५३ कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

आज कोरोनामुळे बोरी बुद्रुक येथील एक ८४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

दिवसेंदिवस वाढत्या कोरोणा रुग्णांमुळे जुन्नर तालुक्यांमध्ये निश्चितपणे चिंतेचे वातावरण पसरले आहे.

कोरोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे गरजेचे असून योग्य कारणासाठीच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसात सुमारे २०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जुन्नर तालुक्यात निष्पन्न झाल्यामुळे व एक हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात आज पर्यंत ११२४ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. यातील सुमारे ६५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ४२१ अँक्टीव रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण ४५ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उदय गोडे व वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

Previous articleदेऊळगाव राजे येथे कोविड सुरक्षा किटचे वाटप
Next articleसामाजिक वारसा जपणारी भोसले आणि गायकवाड प्रतिष्ठीत घराणे विवाहाच्या निमित्ताने आले एकत्रित