देऊळगाव राजे येथे कोविड सुरक्षा किटचे वाटप

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

पुणे जिल्हा परिषदेच्या कोविड कार्ड योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे यांच्याकडून देऊळगाव राजे अंतर्गत येणाऱ्या आशा सेविका,डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी कोविड सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले, हे किट जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे यांच्या हस्ते देण्यात आले.

या किटमध्ये सॅनिटायजर, व्हिटॅमिन सी,या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या,पॅरासिटीमोल,सोडियम हायड्रॉक्लोराईड,थर्मल गण,पीपीई किट ,ऑक्सिपल्स मीटर,इत्यादी चे वाटप करण्यात आले. यावेळी आशा सेविका च्या मागण्या समजून घेवून त्यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले, तर काही मागण्या कार्यक्रम स्थळी च मान्य केल्या, यामुळे वीरधवल जगदाळे यांच्या कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष कृतीची परिचिती उपस्थिताना आली.यावेळी देऊळगाव राजे चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित सांगळे,आरोग्य सहाय्यक आर.एस.जांभळे,जी.एल.ताटे,पोलीस पाटील सचिन पोळ,भानुदास औताडे,दादासो गिरमकर, संदीप पोळ व आशा सेविका,आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

देऊळगाव राजे व परिसरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग,ग्रामपंचायत, पोलीस पाटील वेगवेगळे उपक्रम हाती घेत आहेत, यातच गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने गावबंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, आशासेविका घरोघरी जावून विचारपूस, तपासणी करत आहेत, गावांमध्ये जंतुनाशक फवारणी मोहीम राबविण्यात येत आहे,यातच आज वीरधवल बाबा जगदाळे यांच्या वतीने देण्यात आलेले हे सुरक्षा किट यामुळे कर्मचारी व अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले आहे,तरी नागरिकांनी काळजी घ्यावी,सोशल डिस्टन्स,मास्क,सॅनिटायजर याचा वापर करावा.

Previous articleशिरोली मधील अंबिका तरुण मंडळाचा गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम
Next articleजुन्नर तालुक्यात आज एकूण ५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले