सामाजिक वारसा जपणारी भोसले आणि गायकवाड प्रतिष्ठीत घराणे विवाहाच्या निमित्ताने आले एकत्रित

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन – प्रतिनिधी

समाजातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, अध्यात्मिक ,कृषी क्षेत्रातील हे दोन्ही प्रतिष्ठित घराणे असून भोसले परिवार मधील चि.रणजित व गायकवाड परिवार मधील चि.सौ.कां.अमृता या उच्चशिक्षित वधु वराचा बारामती याठिकाणी स्वतःसह केवळ दोन्ही कुटुंबातील मोजक्या सदस्याच्या उपस्थितीत शुभविवाह नुकताच साध्या पध्दतीने पार पडला व आपल्या वैवाहिक जीवनाला कोरोनाच्या साक्षीने सुरवात केली.

कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी यावेळी सोशल डिस्टनशिंग, मास्क व सॅनिटायझर वापर करण्याची सक्ती सर्वांना करण्यात आली होती .वधु – वर यांचे आगमन झाल्यास निर्जंतुकीकरण औषध फवारणी करुन आत मध्ये सोडण्यात आले. बाळकृष्ण बाबुराव भोसले पारगाव (ता. दौंड) यांचे चिरंजीव रणजित व कै.बाळासाहेब शंकरराव गायकवाड रा.कंरजेपुल (ता.बारामती) यांची कन्या चि.सौ.कां.अमृता यांचा शुभविवाह नुकताच संपन्न झाला.

केवळ मुलांच्या व मुलीच्या घरातीलच मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीमध्ये हा कौटुंबिक विवाह सोहळा संपन्न करुन ग्रामीण भागातील समाजबांधवांसमोर एक वेगळा आदर्श घालून देत नव्या आव्हानांचा सामना संयमाने करण्याचा संदेश सर्वांपुढे ठेवला. विशेष म्हणजे ही दोन्ही घराणी सामाजिक वारसा असणारी. औपचारिकता वधू वराला शुभआशिर्वाद सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी दिले. मोठ्या डामडौलात आपल्या मुलामुलींची लग्ने करणे ही सध्या खासियत झाली आहे पण कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत या डामडौलाच्या परंपरेला फाटा देत भोसले व गायकवाड कुटुंबाने प्रशासकीय सुचनेनुसार एकदम साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला.

“कुटुंबातील अनेक व्यक्तींना, नातेवाईकांना व मित्रपरिवाराला शुभविवाहला उपस्थित राहता आले नाही, याची खंत असतानाच मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या काळात झालेला हा शुभविवाह अविस्मरणीय ठरणार असल्याचा आनंदही या दोन्ही कुटुंबाला”, होत आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट सांस्कृतिक साहित्य कला विभागाचे हवेली तालुका अध्यक्ष विशाल भोसले यांनी व्यक्त केले.