ऑनर लॅब लिमिटेड कंपनीतून पाच लाखांच्या केमिकल पावडरची चोरी : पाच आरोपी जेरबंद

कुरकुंभ ,सुरेश बागल

कुरकुंभ (ता.दौंड)औद्योगिक वसाहतीतील ऑनर लॅब लिमिटेड या कंपनीमध्ये डी ब्लॉक मटेरियल स्टोरेज रूम मध्ये दरोडा टाकून ४५००० हजार रुपये कि.याप्रमाणे बारा किलो वजनाची ५ लाख ४०००० रुपये एम. एन.एस. (मॉन्टीलूकास्ट सोडियम) पावडर चोरी करून कंपनीतील काही कामगारांना मारहाण करून चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमध्ये कंपनीमधील कंत्राटी कामगारांना पकडण्यात यश आले आहे. याप्रकरणी नितीन धिटे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यामध्ये पाच परप्रांतीय आरोपींना दौंड पोलिसांनी ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार ( गुरुवार दिनांक २४ )रोजी दौंड पोलीस ठाण्यात कंपनीत असणाऱ्या केमिकल पावडरच्या दरोडे चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये १) पवन कुमार चिकरमाराम भारती ( मूळ रा. गावापूर ,तहसील मरमदाबाद, राज्य उत्तर प्रदेश ) २) विजयकुमार मोतीलाल ( मूळ रा.विजयनगर, इथारी बरीयापूर, जि.मुंगेर ,राज्य बिहार )

३) संतोष योगेंद्रनाथ मिश्रा ( मूळ रा. साउथ कॉलनी, तहसील साहेबगंज, राज्य झारखंड ) ४) जितेंद्र कुमार गोपीनाथ पुरी ( मूळ रा. पहारपुर, पोस्ट दुर्गापूर, तहसील तीन पहाड, जिल्हा साहेबगंज, राज्य झारखंड ) ५ ) राजकुमार पत्तरदिन पुष्पाकार ( मूळ रा. वैष्णव रेसिडेन्सी ,राजपिपला रोड, गोखल ,भरूच राज्य गुजरात ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच कंत्राटी कामगारांना पकडण्यात दौंड पोलिसांना पकडण्यात यश आले आहे.

वरील पाचही संशयित आरोपी हे ऑनर लॅब कंपनीत कंत्राटी पद्धतीने कामाला असून, सर्वजण सध्या कुरकुंभ परिसराच्या जवळपास राहण्यास आहेत. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद गटकुळ करीत आहेत.

Previous articleआंबेगाव- शिरूर साठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत रु. ५.०० कोटी निधी मंजूर – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील
Next articleमा. खासदार आढळराव पाटील यांनी पालिका आयुक्तांची घेतली भेट.