लाला अर्बन बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्षात ५०० कोटी ठेवींचे उद्दिष्ट – युवराज बाणखेले

नारायणगाव (किरण वाजगे)

लाला अर्बन बँकचे सुवर्ण महोत्सवी वर्षात ५०० कोटी ठेवींचे उद्दिष्ट आहे. लवकरच हे उद्दिष्ट पूर्ण करणार असून अहमदनगर,ठाणे, सातारा, सोलापूर, रायगड येथे कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी रिझर्व बँकेकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला असल्याचे अध्यक्ष युवराज बाणखेले यांनी सांगितले.

नारायणगाव येथील लाला बँकेच्या हायवे शाखेचे नवीन जागेत स्थलांतर करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. बँकेच्या स्थलांतरित शाखेचे उद्घाटन संचालिका मथुरा बाणखेले, माजी आमदार शरद सोनवणे, जुन्नर,आंबेगाव, खेड तालुका ज्येष्ठ संघाचे सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.

सुवर्णमहोत्सवी लोगोचे अनावरण अध्यक्ष युवराज बाणखेले व उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ,एटीएमचे उद्घाटन युवा नेते अमित बेनके, लाला विद्याधन योजनेचा शुभारंभ सभापती वसंत भालेराव, भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात, बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, गुलाब नेहरकर, राजाराम बाणखेले, अविनाश राहणे यांच्या हस्ते झाले.

स्व. किसन बाणखेले यांनी लाला बँक सर्वसामान्य जनतेसाठी स्थापन केलेली असून गेली ५० वर्षात बँकेने अनेक चढउतार बघितले असून युवराज बाणखेले यांनी गेली वर्षभरात नेमदिपक कामगीरी केली असल्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी म्हटले. तर सुवर्ण महोत्सवी वर्षात विविध उपक्रमांचे आयोजन करणार असल्याचे उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ यांनी म्हटले.

यावेळी जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष महादेव वाघ, सुरेश कोते, रामदास बाणखेले, नितीन लोणारी, मंगेश बाणखेले, नारायण गाढवे, जयसिंग थोरात, ज्ञानेश्वर औटी, संदिप लेंडे, सचिन कांबळे, सुनिता साकोरे, इंदूमती कवडे, सुनिल भुजबळ, भानुदास टेंगले, जेईनुद्दीन मुल्ला, विमल थोरात, प्रियंका शेळके, शिवाजी खैरे, संजय थोरात, अविनाश राहणे, गणेश कवडे, विकास दरेकर, राजू इनामदार, सुनिल बाणखेले, टी.आर.वामन, सुशांत थारात, अरुण लोंढे, अशोक जाधव, बाळासाहेब शिदे, मारुती चासकर, संतोष वाजगे, प्रकाश पाटे, किरण वाजगे, शैलेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleमहाराष्ट्र निर्माण सेनेचा एक सुंदर उपक्रम ;श्रावणी सोमवारच्या निमित्ताने फराळ वाटप
Next articleमांजरी खुर्द ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अशोक आव्हाळे यांची बिनविरोध निवड