मांजरी खुर्द ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अशोक आव्हाळे यांची बिनविरोध निवड

उरुळी कांचन

मांजरी खुर्द (ता.हवेली) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अशोक काशिनाथ आव्हाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मांजरी खुर्द येथील ग्रामसचिवालयात बुधवार (ता.२३) रोजी ग्रामसभा संपन्न झाली. या सभेत सोसायटीचे माजी चेअरमन दादासाहेब उत्तम उंद्रे यांनी सुचना मांडली व त्या सुचनेला प्रा.नवनाथ नेवाळे यांनी अनुमोदन दिले. यानंतर सरपंच सिताराम उंद्रे व माजी उपसरपंच प्रकाश सावंत यांनी अशोक आव्हाळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले असता संपूर्ण ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून या निवडीचा आनंद व्यक्त केला.

अशोक आव्हाळे हे साप्ताहिक ज्ञानलीलाचे उपसंपादक व साई गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन म्हणून काम करत असून एक “उत्कृष्ट निवेदक” व “कोरोना योद्धा” म्हणून परिसरात आव्हाळे यांचा मोठा नावलौकिक आहे.

माझ्यावर समस्त ग्रामस्थांनी जो विश्वास दाखविला आहे त्या विश्वासाला पात्र राहून गावात एकोपा तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आव्हाळे यांनी सांगितले.

याप्रसंगी सरपंच सिताराम उंद्रे यांच्या हस्ते व उपसरपंच किर्ती उंद्रे, माजी उपसरपंच प्रकाश सावंत, माजी उपसरपंच किशोर उंद्रे, माजी उपसरपंच विकास उंद्रे, माजी सरपंच स्वप्निल उंद्रे, उद्योजक सचिन उंद्रे, आध्यात्मिक विकास परिषदेचे अध्यक्ष हभप जगदीश महाराज उंद्रे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत आव्हाळे यांचा सन्मान करण्यात आला.या निवडी नंतर अशोक आव्हाळे यांचे परिसरातुन अभिनंदन होताना दिसत आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य अभिजित उंद्रे, रुपेश उंद्रे,सागर उंद्रे, प्रतिक भोसले, अशोक माने, वैशाली काकडे,सीमा सावंत, मनिषा ढेरे, वर्षा उंद्रे, ग्रामसेवक मयूर उगले, पै.बाळासाहेब भोसले, हनुमंत उंद्रे, लक्ष्मण नेवाळे, सतिश आव्हाळे, संजय उंद्रे,संगिता शिनगारे, सुरेखा उंद्रे, सुरेश साळुंके, महेश थोरात, नंदकुमार शेवाळे, अनिल थोरात, गुलाब उंद्रे, रविंद्र काकडे, जीवन उंद्रे, आनंदा मुरकुटे, योगेश माझीरे, अमोल हगवणे,समिर उंद्रे, महेंद्र आदमाने, संतोष मुरकुटे, धर्मेंद्र मोरे,अमित किंडरे, म्हस्कु उंद्रे इ. मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होते.

Previous articleलाला अर्बन बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्षात ५०० कोटी ठेवींचे उद्दिष्ट – युवराज बाणखेले
Next articleअंगणवाडी सेविकांच्या मागण्या बाबत सरकार सकारात्मक : अदिती तटकरे यांचे आश्वासन